शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

केंद्र सरकारने केला आसामी जनतेचा घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 06:15 IST

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

मेघना ढोके

देशाला आमचा प्रश्नच कळलेला नाही. माध्यमे नागरिकत्व कायद्याचा प्रश्न हिंदू-मुस्लीम असा मांडत आहेत, पण आसाम व ईशान्य भारतासाठी विदेशातून आलेले, येणारे लोंढे हा जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. नागरिकत्व कायद्याला आम्ही करो या मरो या वृत्तीने विरोध करू, आसाम कदापि बांगलादेशी लोंढ्यांना स्वीकारणार नाही, असं स्पष्ट मत आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुलकुमार महंतो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केलं.

१९८०च्या दशकात आसाममध्ये तरुणांनी परप्रांतीय लोंढ्यांच्या विरोधात सहा वर्षे चालविलेल्या आंदोलनाचे महंतो नेते होते. आसाम करार हे या आंदोलनाचेच फलित. त्यातूनच महंतो यांची आसाम गण परिषद सत्तेत आली. आसामचे मसिहा अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र, नंतर ते भाजपसोबत गेल्याने त्यांच्यावर टीका खूप झाली. नागरिकत्व कायदाप्रश्नी त्यांनी आसामच्या भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे.एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय?पूर्ण विरोध. शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करू. आसामींच्या जगण्यावरच आक्रमण होणार असेल, आसामात आम्ही अल्पसंख्य होणार असू तर जगायचं कसं, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. बंगाली लोंढे लादणारा हा घातक कायदाआहे.देशभर एनआरसी करू, अशा घोषण होत आहेत. त्यातच नागरिकत्व दुरुस्ती कायदा...तेच दुर्दैव आहे, आसामींनी एनआरसी शांतपणे निभावली, पण नव्या कायद्याने केंद्र सरकार ती मोडीत काढतेय. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू बंगाली लादून आसामलाच ‘बंगालीबहुल’ करण्याचा हा डाव आहे...पण पुढे काय?भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, हेच आता मोदी सरकार बदलायला निघाले असेल, तर आम्ही आसामी आणि ईशान्य भारतीय तरी त्याचा प्राणपणाने विरोध करू. आम्हाला कोणत्याच धर्माचे ‘बिदेशी’ लोक नकोत, आम्ही हे लोंढे अनेकदा स्वीकारले आणि पस्तावलो आहोत. यापुढे आसामसह ईशान्य भारतात जो काही असंतोष उसळेल आणि त्याचे जे परिणाम होतील त्यांना केवळ केंद्र सरकार जबाबदार असेल. आसामी माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा कुणी पाहू नये! आमची भाषा, संस्कृती, रोजगार व अस्तित्व यावरच हा घाला आहे. एनआरसीचा खेळ झाला, जो विषण्ण करणारा आहे.बांगलादेशातील हिंदू बंगाली लादून आसामला ‘बंगालीबहुल’ करण्याचा हा डाव आहे. - प्रफुलकुमार महंतो 

टॅग्स :AssamआसामCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा