स्पेक्ट्रममुळे केंद्र सरकार मालामाल; ७७ हजार कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 06:31 AM2021-03-03T06:31:32+5:302021-03-03T06:31:43+5:30

एअरटेलने ३५५.४५ मेगाहर्टझ व २३०० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यामुळे कंपनीकडे विविध बँडमध्ये सर्वाधिक स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहेत. याचा वापर ५जी सेवेसाठी होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.  

Central Government goods due to spectrum; 77,000 crore revenue | स्पेक्ट्रममुळे केंद्र सरकार मालामाल; ७७ हजार कोटींची कमाई

स्पेक्ट्रममुळे केंद्र सरकार मालामाल; ७७ हजार कोटींची कमाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पाच वर्षांनी झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात केंद्र सरकार मालामाल झाले आहे. सरकारने स्पेक्ट्रम विकून ७७ हजार ८१४ कोटींची कमाई केली आहे. सर्वाधिक स्पेक्ट्रम रिलायन्स जिओने खरेदी केले आहेत. लिलावात ५जी स्पेक्ट्रम विक्रीसाठी उपलब्ध केले नव्हते.


८५५.६० मेगाहर्ट्झपर्यंत स्पेक्ट्रम दोन दिवसांत विकले गेले. जिओने सर्वाधिक ५७,१२२ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले. व्होडाफोन-आयडियाने १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली होती. भारती एअरटेलने १८ हजार ६९९ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम विकत घेतले. 
लिलावात ८००, ९००, १८००, २१०० व २३०० मेगाहर्ट्झ बँडसाठी बोली लावण्यात आली. मात्र, ७०० व २५०० मेगाहर्ट्झ बँडसाठी कोणीच बोली लावली नाही. गेल्या वेळी ७०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकले गेले नव्हते. यंदाही तसेच झाले. हा स्पेक्ट्रम ३.५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसोबत जोडला आहे. भविष्यात भारताला डिजिटल क्षेत्रातील आघाडीच्या देशांमध्ये समाविष्ट करण्यासाठी तो उपयोगी ठरू शकतो.  त्यामुळे या स्पेक्ट्रमसाठी सर्वाधिक आरक्षित मूल्य ठेवले होते.


गीगाहर्ट्झ बँडच्या खालील इतर स्पेक्ट्रम कमी किमतींत उपलब्ध आहेत. नव्या स्पेक्ट्रमसाठी बहुतांश ऑपरेटर्स इच्छुक दिसले नाहीत, कारण नव्या स्पेक्ट्रमसाठी उपकरणे अद्ययावत करावी लागतील आणि तो खर्च वाढेल. २२५० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी सोमवारी लिलाव सुरू झाले होते. त्याचे आरक्षित मूल्य चार लाख कोटी रुपये होते. सरकारी कंपन्यांचा सहभाग नाही.
बीएसएनएल व एमटीएनएल यांचा लिलावात सहभाग नव्हता.  सरकारी स्पेक्ट्रमच्या लिलावात या कंपन्यांचे सहभागी होणे हितसंबंधांमध्ये अडथळा ठरले असते, असे सरकारचे म्हणणे आहे. 

५ जीसाठी वापर शक्य
एअरटेलने ३५५.४५ मेगाहर्टझ व २३०० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यामुळे कंपनीकडे विविध बँडमध्ये सर्वाधिक स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहेत. याचा वापर ५जी सेवेसाठी होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.  


सर्वाधिक ‘जिओ’कडे 
स्पेक्ट्रम वाढविल्यामुळे डिजिटल सेवेचा विस्तार करण्यास मदत हाेणार आहे. तसेच अतिरिक्त स्पेक्ट्रममुळे ‘५जी’ सेवा देण्यासाठी सज्ज झाल्याचे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्सकडे आता एकूण १७१७ मेगाहर्टझ स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहे.

४जी कव्हरेज सुधारण्यासाठी वापर
व्होडाफोन-आयडियाने पाच सर्कलमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यांचा वापर ४जी कव्हरेजमध्ये सुधारणा करण्यासाठी करण्यात येणार आहे.

Web Title: Central Government goods due to spectrum; 77,000 crore revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.