आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:08 IST2025-07-25T13:08:17+5:302025-07-25T13:08:59+5:30

Soft Porn Content Apps Ban in India: भारतात कोरोना काळात पॉर्न वेबसाईटवर बंदी आणल्यानंतर सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखविण्यास विविध कंपन्यांनी सुरुवात केली होती. यात उल्लू अ‍ॅप, एएलटीटी सारख्या अ‍ॅप्सनी धुमाकूळ घातला होता.

Central government bans soft porn content apps like Ullu, ALTT, Desiflix, Big Shots see full list... | आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...

आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...

केंद्र सरकारने सॉफ्ट पॉर्न कंटेंटवर मोठी कारवाई केली आहे. यामुळे आंबटशौकिन चांगलेच अडचणीत आले आहेत. उल्लू अ‍ॅप, एएलटीटी, डेसिफ्लिक्स आणि बिग शॉट्स सारख्या सेमी पॉर्न प्रसारित करणाऱ्या अ‍ॅप्सवर बंदी आणण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 

भारतात कोरोना काळात पॉर्न वेबसाईटवर बंदी आणल्यानंतर सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखविण्यास विविध कंपन्यांनी सुरुवात केली होती. यात उल्लू अ‍ॅप, एएलटीटी सारख्या अ‍ॅप्सनी धुमाकूळ घातला होता. तरुण वर्गासह सर्वच वयोगटाला या अ‍ॅप्सनी भुरळ घातली होती. यामुळे तरुण पिढी देखील बिघडत चालली होती. याला आवर कसा घालावा, असा प्रश्न केंद्र सरकारसमोर होता. यावर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

इंटरनेट सेवा प्रदात्यांना देशभरात अशा प्रकारची सामग्री दाखवणाऱ्या २५ वेबसाइट तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सरकारने सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ७९(३)(ब) व आयटी नियम, २०२१ च्या नियम ३(१)(ड) नुसार कारवाई केली आहे. इंटरनेट प्रोव्हायडरना मध्यस्थ घोषित करण्यात आले आहे. त्यांच्यावरच ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

या अ‍ॅप, वेबसाईटचा आहे समावेश...
एएलटीटी, उल्लू, बिग शॉट्स अ‍ॅप, डेसिफ्लिक्स, बूमेक्स, नवरासा लाईट, गुलाब अ‍ॅप, कंगन अ‍ॅप, बुल अ‍ॅप, जलवा अ‍ॅप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिटप्राइम, फेनिओ, शोएक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉटएक्स व्हीआयपी, हलचल अ‍ॅप, मूडएक्स, निऑनएक्स व्हीआयपी, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रायफ्लिक्स या सॉफ्ट पॉर्न दाखविणाऱ्या प्लॅटफॉर्मवर बंदी आणण्यात आली आहे. 

Web Title: Central government bans soft porn content apps like Ullu, ALTT, Desiflix, Big Shots see full list...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.