शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

आंध्र प्रदेशाला केंद्राकडून १२६९ कोटींचा निधी, नायडूंना चुचकारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 5:31 AM

आंध्र प्रदेशाला केंद्राकडून कमी निधी मिळत असल्याने गेले काही दिवस तेलगू देसम व भाजपामध्ये चांगलीच धुसफूस सुरू असतानाच केंद्राने या आंध्रातील विविध विभागांसाठी १२६९ कोटींचा निधी दिला आहे. 

अमरावती : आंध्र प्रदेशाला केंद्राकडून कमी निधी मिळत असल्याने गेले काही दिवस तेलगू देसम व भाजपामध्ये चांगलीच धुसफूस सुरू असतानाच केंद्राने या आंध्रातील विविध विभागांसाठी १२६९ कोटींचा निधी दिला आहे. टीडीपी व भाजपामधील संबंधांमध्ये वादाचा विषय ठरलेल्या पोलावरम प्रकल्पासाठी यात ४१७.४४ कोटी देण्यात आले आहेत.केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाचे वरिष्ठ संयुक्त आयुक्त आर.पी.एस. शर्मा यांनी सांगितले, की आंध्र प्रदेश सरकारने पोलावरम प्रकल्पावर १ एप्रिल २०१४ नंतर काही निधी खर्च केला आहे. या कामासाठी ४१४.४४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. पोलावरम प्रकल्प प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्राने आंध्र सरकारला ४३२९ कोटी रुपयांचा निधी याआधीच दिला आहे. परंतु, आंध्र प्रदेश सरकारचे असे म्हणणे आहे, की राज्याने यावर ७,२०० कोटी रुपये खर्च केले आहेत.आंध्र प्रदेशाचे अर्थमंत्री यनमला रामकृष्णुडू यांनी मागच्या महिन्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन देऊन, पोलावरमवर खर्च केलेल्या ३२१७ कोटी रुपयांच्या निधीचा परतावा केंद्राकडून मिळणे बाकी आहे, असे नमूद केले होते.वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार शुक्रवारी केंद्राकडून राज्यांना हस्तांतरित केल्या जाणाºया अधिकारापोटी महसुली तूट अनुदान म्हणून ३६९ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाची योग्य नोंद  ठेवण्याच्या सूचना केंद्राने राज्याला केली आहे.अंगणवाड्या, पोषक आहारासाठी निधीकेंद्र सरकारने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मूलभूत अनुदानापोटी २५३ कोटींचा निधी वर्ग केला आहे. हा या आर्थिक वर्षातील दुसरा हप्ता आहे. याव्यतिरिक्त राज्याच्या अंगणवाडी, पोषक आहार योजनेसाठी १९६ कोटी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमासाठी आणखी ३१ कोटी रुपये दिले आहेत.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश