शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

केंद्र, राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा, देशात रुग्णांची संख्या २ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 05:58 IST

सर्वोच्च न्यायालय; देशात रुग्णांची संख्या २ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, कोरोना रुग्णांची एकूण संख्या दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.सोमवारी कोरोनाचे ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळून आले, तर ३ लाख ७३२ रुग्ण बरे झाले. या दिवशी कोरोनामुळे ३४१७ जण मरण पावले आहेत. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १९९२५६०४ झाली आहे, तर उपचाराधीन रुग्णांचा आकडा ३४१३६४२ आहे. आतापर्यंत १६२९३००३ जण कोरोनातून बरे झाले, तर बळींची एकूण संख्या २१८९५९ आहे. देशात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.७७ टक्के झाले आहे.

कोरोनाची ही भयावह स्थिती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने रविवारी एका आदेशात म्हटले आहे की, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी सार्वजनिक सभा, समारंभांवर, तसेच संसर्ग पसरू शकणाऱ्या अन्य कार्यक्रमांवर सध्या बंदी घालावी. केंद्र किंवा राज्य सरकारांनी जर लॉकडाऊन लागू केलाच तर त्याचा फटका तळागाळातील व गरीब लोकांना बसतो. त्यामुळे या लोकांचे हाल होणार नाहीत याची सरकारने आधीच तजवीज करून मगच लॉकडाऊनचे पाऊल उचलावे, असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे.

कोरोना संसर्गाचा मोठा फैलाव होऊ नये म्हणून केलेल्या उपाययोजनांचा तपशील केंद्र व राज्य सरकारने सादर करावा, तसेच भविष्यात काय उपाययोजना करणार हेही सांगावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कोणताही कोरोना रुग्ण हा रुग्णालयात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता सरकारने घ्यावी, तसेच सर्व ठिकाणी औषधे, ऑक्सिजनची टंचाई अजिबात असू नये यासाठी प्रयत्न करावेत. निवासाचा पुरावा, तसेच ओळखपत्र नाही म्हणून कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही असे घडू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता नाहीn    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता नाही. केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.n    वाढता संसर्ग व रुग्णसंख्येमुळे १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी याआधीच कडक निर्बंध लागू केले आहेत. 

n    देशातील १५० जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण १५ टक्के असून तिथे कडक लॉकडाऊन लागू करावे अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने काही दिवसांपूर्वी केली होती.n    कुंभमेळ्याहून परतलेल्या लोकांमुळेही कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असून त्यामुळे केंद्रीय आरोग्य खाते व कोरोना साथीसंदर्भात सरकारने नेमलेल्या टास्क फोर्समधील अधिकारीही चिंताग्रस्त झाले आहेत. n    देशात दररोज तीन लाखांपेक्षा नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. 

n    रेमडेसिविरसारखी औषधे तसेच ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कोरोना रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांनाही खूप हाल सोसावे लागत आहेत. ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन देशात होत आहे, असे केंद्र सरकार सांगत असले तरी त्याचा तुटवडा तर जाणवत आहे.n    केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे कोरोना साथीमधील स्थिती आणखी बिघडली आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

रुग्णालय प्रवेशाबाबत लवकरच धोरण हवेसर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबत केंद्र सरकारने दोन आठवड्यांत धोरण ठरवावे. 

सहा महिने पुरेल इतका करा लससाठा देशात कोरोना लसींचा येत्या सहा महिन्यांच्या काळात पुरेल इतका साठा आहे का, याची केंद्र व राज्य सरकारांनी पडताळणी करावी, तसेच ऑक्सिजनचाही पुरेसा साठा करावा. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय