शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने आश्वासने पूर्ण केलीच नाहीत; बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 06:51 IST

एमटीएनएलमध्येही आंदोलन; देशभरातील कर्मचारी सहभागी

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज कर्मचाऱ्यांनी सोमवारी देशभर लाक्षणिक उपोषण केले. दोन्ही कंपन्यांचे देशभरातील सर्व कर्मचारी त्यात सहभागी झाले होते.बीएसएनएलएमटीएनएल या तोट्यात व कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या कंपन्यांसाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१९ मध्ये ६८ हजार ७५१ कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. त्यात दोन्ही कंपन्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचाही भाग होता. त्यानुसार ७८ हजारांहून अधिक कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली; पण सरकारच्या बाजूने जे पॅकेज जाहीर केले, ते अद्याप दिलेले नाही, अशी दोन्ही कंपन्यांतील कर्मचाºयांची तक्रार आहे. बीएसएनएल व एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांना ४-जी स्पेक्ट्रम देण्याचे सरकारने ठरविले होते. ते अद्याप दिले नसून, या कंपन्या केवळ ३-जी स्पेक्ट्रम ही जुनीच सेवा ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक या कंपन्यांपासून दूर चालले आहेत. ते टिकवून ठेवण्यासाठी ४-जी स्पेक्ट्रम ताबडतोबीने देणे गरजेचे आहे, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.या दोन्ही कंपन्यांना १५ हजार कोटी रुपये बाजारातून उभे करण्यासाठी बँक हमी देण्याचे केंद्राने मान्य केले होते. त्यामुळे या दोन्ही कंपन्या अद्यापही अडचणीत आहेत. केंद्राच्या बँक हमीशिवाय ही रक्कम उभी करणे दोन्ही कंपन्यांना अशक्य आहे. शिवाय आर्थिक पॅकेजही सरकारने दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाºयांना आजही वेळेवर पगार मिळण्यात अडचणी येत आहेत.कंपन्या तगणार का?सरकारच्या आग्रहामुळे दोन्ही कंपन्यांतील ६८ हजार कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असली तरी समस्या कायमच आहेत. त्यामुळे या कंपन्या जिवंत ठेवण्यात सरकारला रस आहे का, अशी शंका कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMTNLएमटीएनएल