शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दंडुका बाजूला ठेवून काश्मिरींशी चर्चा, संवाद साधण्यासाठी केंद्राचा प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 06:51 IST

नवी दिल्ली : फुटीरतावाद आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या जम्मू-काश्मीरमधील असंतोष दंडुकेशाहीने शमविण्याचा दृष्टीकोन बदलून केंद्र सरकारने आता तेथील जनतेशी संवाद साधण्याचे ठरविले.

हरिश गुप्ता नवी दिल्ली : फुटीरतावाद आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या जम्मू-काश्मीरमधील असंतोष दंडुकेशाहीने शमविण्याचा दृष्टीकोन बदलून केंद्र सरकारने आता तेथील जनतेशी संवाद साधण्याचे ठरविले असून, त्यासाठी ‘संवादक’ (इंटरलोक्युटर) म्हणून आपला प्रतिनिधीही नेमला आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. काश्मीर समस्येवर तोडगा शोधण्यासाठी त्या राज्यातील सर्व समाजवर्गांशी निरंतर स्वरूपाचा संवाद करण्याचे सरकारने ठरविले आहे. यासाठी ‘इंटलिजन्स ब्युरो’चे (आयबी) निवृत्त संचालक दिनेश्वर शर्मा केंद्र सरकारच्या वतीने प्रतिनिधी म्हणून काम करतील, असेही त्यांनी जाहीर केले. या कामासाठी शर्मा यांना कॅबिनेट सचिवाचा दर्जा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.> शर्मा यांना सर्वाधिकारसंवादात काश्मीरमधील पाकधार्जिण्या फुटीरतावादी नेत्यांनाही सहभागी करून घेणार का? असे विचारता स्पष्ट नकार न देता गृहमंत्री म्हणाले की, याचा निर्णय शर्मा यांनी घ्यायचा आहे. त्यांना सर्वाधिकार दिले आहेत. संवाद सुरू असताना काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यावर केंद्राचा भर असेल आणि तरुणांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देईल, अशी ग्वाहीही राजनाथ सिंह यांनी दिली. काश्मीरबाबत केंद्र संवेदनशील आहे, हे सांगताना सिंग यांनी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा दाखला दिला. ‘गोळ्यांनी नव्हे, तर लोकांची मने जिंकूनच काश्मीर समस्येवर तोडगा निघू शकेल,’ असे मोदी तेव्हा म्हणाले होते.सरकारने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.ती यशस्वीपणे पार पाडेन, अशी अपेक्षा आहे.- दिनेश्वर शर्मा, काश्मीरचर्चेसाठी केंद्राचे प्रतिनिधीकाश्मीरमध्ये दंडुकेशाहीचामार्ग असफल ठरल्याची ही कबुली आहे. ‘अजिबात चर्चा’ नाहीते ‘सर्व संबंधितांशी संवाद’ हे स्थित्यंतर काश्मीर समस्येवरराजकीय तोडग्याचा सातत्याने आग्रह धरणाºयांचा विजय आहे.- पी. चिदम्बरम, माजी केंद्रीय गृहमंत्रीकाश्मीरची समस्या राजकीय स्वरूपाची आहे व ती त्याच पद्धतीने सोडविली जाऊ शकेल, हे मान्य करणे हा बळाचा वापर हाचमार्ग असल्याचे मानणाºयांचा मोठा पराभव आहे.- ओमर अब्दुल्ला,माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरRajnath Singhराजनाथ सिंह