हिंसक विरोध आणि पोलिसी कारवाईत व्हॅलेंटाईन डे साजरा
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:23+5:302015-02-14T23:50:23+5:30
उत्तर प्रदेश : जोडप्यांना कोंबडा बनविले, पळविले, मारहाणही केली

हिंसक विरोध आणि पोलिसी कारवाईत व्हॅलेंटाईन डे साजरा
उ ्तर प्रदेश : जोडप्यांना कोंबडा बनविले, पळविले, मारहाणही केलीलखनौ : प्रेमीजनांचा सर्वांत महत्त्वाचा व्हॅलेंटाईन डे उत्तर प्रदेशात शिवसेना, बजरंग दल, हिंदू युवा वाहिनीची उग्र हिंसक निदर्शने आणि पोलीस कारवाईत साजरा करण्यात आला.अनेक संघटनांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे वेगवेगळे पार्क, रेस्टॉरंट येथे प्यार का इजहार करणार्या जोडप्यांना अक्षरश: पळायला लावले, कोंबडा बनविले आणि उठा-बशा करायला लावल्या. व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याबाबत त्यांच्याकडून वदवून घेतले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करताना पोलिसांनी कठोर भूमिका घेतली होती. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी आधीच जाहीर केले होते की, त्यांचे कार्यकर्ते आज एकत्र फिरणार्या जोडप्यांना समजाविणार आहेत. जोडपे ज्या संस्कृतीमागे धावत आहेत, ती किती चुकीची आहे, प्रेम ही काही असा एक दिवस साजरा करण्याची गोष्ट नाही, पार्क-रस्त्यांवर प्रेमाचे प्रदर्शन योग्य नव्हे, असे त्यांनी शेकडो जोडप्यांना समजावूनही सांगितले. जे वयस्क जोडपे त्यांच्यातील संबंध दृढ करून विवाह करू इच्छित असतील त्यांना मदत करण्याचा वायदाही त्यांनी केला. विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शॉपिंग मॉल, पार्क, सिनेमागृहे, रेस्टॉरंट, सार्वजनिक ठिकाणी कडेकोट सुरक्षा ठेवली होती. कायदा-व्यवस्था हातात घेणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी आधीच जाहीर केले होते, त्याप्रमाणे अनेक ठिकाणी त्यांनी कारवाईही केली...............................................चौकटकुठे, काय घडले?-लखीमपूर खिरी येथे भगवे कपडे परिधान करून मॉरल पोलिसिंग करणार्या १३-१४ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या आई-वडिलांना याबाबत नोटिसाही पाठविण्यात आल्या. -बुलंदशहरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी प्यार का इजहार करणार्या अनेक जोडप्यांना पळवून लावले. काही रेस्टॉरंटमध्ये घुसून जोडप्यांना मारहाणही केली. यामुळे इतर लोकही त्रस्त झाल्याचे दिसले.-लखनौ येथे बगिच्यांमध्ये बजरंग दल कार्यकर्त्यांनी जोडप्यांना कोंबडा बनविले आणि पळविलेही. आलमबाग, राजाजीपूरम आणि इंदिरानगर येथे मिरवणुका काढून परिसरातील बगिच्यांमध्ये बसलेल्या जोडप्यांना हुसकावून लावले. याशिवाय एका ठिकाणी एका जोडप्याला मारहाणही केली.-बरेली येथून मिळालेल्या वृत्तानुसार, हिंदू युवा वाहिनी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोडप्यांची धुलाई केली. या प्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली. बरेलीत व्हॅलेंटाईन डेचा पुतळाही जाळण्यात आला.-नोएडा आणि गाझियाबाद येथे सुमारे ८०० जोडप्यांना पांढरी फुले देऊन समजाविण्यात आले आणि त्यांनीही प्रेमाचे प्रदर्शन करण्याची गरज नाही, हे मान्य केले.