आकोटात सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळा साजरा

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:54+5:302015-02-14T23:51:54+5:30

आकोट : येथील श्री दुर्गा माता मंदिराच्या प्रांगणात मंगळवारी सामूहिकरीत्या मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला.

Celebrate the collective maternal patriarchal celebration in the square | आकोटात सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळा साजरा

आकोटात सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळा साजरा

ोट : येथील श्री दुर्गा माता मंदिराच्या प्रांगणात मंगळवारी सामूहिकरीत्या मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला.
मुलां-मुलींवर चांगले संस्कार घडावेत, या उद्देशाने येथील युवा सेवा संघ आणि श्री योग वेदांत सेवा समितीतर्फे सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम प्रोजेक्टरद्वारा मातृ-पितृ पूजन कसे आणि का करावे, याबाबत माहिती देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश पांडे यांनी भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी समिती व युवा संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सोहळ्याला बहुसंख्येने पालक व बालक-बालिका उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)
फोटो : १३एकेटीपी०७.जेपीजी

Web Title: Celebrate the collective maternal patriarchal celebration in the square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.