Bipin Rawat Helicopter Crash: सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन; हवाई दलाकडून घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 18:15 IST2021-12-08T18:14:48+5:302021-12-08T18:15:45+5:30
CDS Bipin Rawat dead: भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात CDS जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जणांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते.

Bipin Rawat Helicopter Crash: सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन; हवाई दलाकडून घोषणा
तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 12 लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे.
Indian Air Force announces the demise of CDS General Bipin Rawat along with 12 others in chopper crash pic.twitter.com/8Ebrz6OoQZ
— ANI (@ANI) December 8, 2021
भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात CDS जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जणांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास करत होते. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. डीएनए चाचणीच्या मदतीनं १३ मृतदेहांची ओळख पटवली जाणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुपारी पाऊणच्या सुमारास तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे चॉपरचं सारथ्य होतं.
चॉपरमध्ये कोण कोण होतं?
बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते.
संबंधीत बातम्या...
एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हेलिकॉप्टर आदळत होते; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घडलेला थरार