शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही : ठोस कारवाई नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 06:33 IST

कालबद्ध कारवाईच्या सूचना

खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसविणे हा घटनेच्या अनुच्छेद २१ मध्ये नमूद नागरिकांच्या स्वतंत्रपणे जगण्याच्या मूलभूत अधिकारांशी निगडित महत्त्वाचा विषय आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने कालबद्ध कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

२ डिसेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पोलीस ठाणे, सीबीआय, ईडीसारख्या सर्व तपास यंत्रणांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. यावरील कारवाईचा आढावा न्या. आर. एफ. नरिमन, बी. आर. गवई आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने घेतला. राज्य सरकारांनी यासाठी ठोस कारवाई केली नाही. तसेच अ‍ॅक्शन प्लान बनवलेला नाही. याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयात २ एप्रिल २०२१ पर्यंत यासाठी वित्तीय तरतूद करावी आणि यापुढे चार महिन्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण करावे, असे आदेश दिले.

केंद्र सरकारतर्फे सॉलिसीटर जनरल यांनी या कामांसाठी राज्य सरकारांनी वित्तीय तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगताच न्यायालयाने सीबीआय, एनआयए, ईडी, एनसीबी, डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस या ठिकाणांबाबत काय कारवाई केली, असा प्रश्न विचारात केंद्र यात पाय ओढत आहे, असे दिसते अशी टिपणी केली.

ऑगस्टपर्यंत...n    सर्व राज्यांना ऑगस्ट २१ पर्यंत सीसीटीव्ही बसवावे लागणार.n    सर्व पोलीस ठाणे, तपास यंत्रणांच्या इमारतीत, बाहेर परिसरात सीसीटीव्ही लागणार.n    नाईट व्हिजन व आवाज नोंदवण्याची सुविधा आवश्यक. 

n    निवडणुका असणाऱ्या ४ राज्यांसाठी, उत्तर प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने जास्त वेळ.n    महाराष्ट्रात २१ मार्च २०२१ पर्यंत सीसीटीव्हीचे काम पूर्ण करण्याचे सुतोवाच. मात्र, पोलीस ठाणेनिहाय प्रगती दाखविणारे शपथपत्र सचिवांनी दाखल करण्याचे आदेश.n    कोठडीतील हिंसाचाराच्या तक्रारीत सीसीटीव्ही मिळण्याचा पीडितास अधिकार राहील. - सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcctvसीसीटीव्ही