फिल्मी स्टंटप्रमाणे हवेत उडाली भरधाव कार; थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 11:24 AM2021-11-13T11:24:48+5:302021-11-13T11:25:03+5:30

पेट्रोल पंपवरील सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद

cctv over speeding car goes out of control and hits bushes agar malwa in madhya pradesh | फिल्मी स्टंटप्रमाणे हवेत उडाली भरधाव कार; थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

फिल्मी स्टंटप्रमाणे हवेत उडाली भरधाव कार; थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

googlenewsNext

देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय देणारी घटना मध्य प्रदेशच्या मालवा जिल्ह्यात घडली आहे. एक भरधाव कार अनियंत्रित होऊन फिल्मी स्टंटप्रमाणे हवेत उडाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. भीषण अपघात होऊनही सुदैवानं कारमधील सगळे जण थोडक्यात वाचले.

आगर मालवा जिल्ह्यातील सुसनेर मोडी मार्गावर एका पेट्रोल पंपसमोरून एक कार भरधाव वेगानं जात होती. रस्त्याशेजारी असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे कार हवेत उडाली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडूपांमध्ये जाऊन पडली.

भरधाव वेगात निघालेली कार एखाद्या चित्रपटातील स्टंटप्रमाणे हवेत उडाली. त्यानंतर रस्त्याशेजारी असलेल्या झाडांना धडक देत झुडूपांमध्ये पडली. पेट्रोल पंपवरील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली. सुदैवानं कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

Web Title: cctv over speeding car goes out of control and hits bushes agar malwa in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.