शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईचा फाॅर्म्युला ठरला, राज्य शिक्षण मंडळाचा कधी ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 05:36 IST

विद्यार्थी, पालकांपुढे प्रश्नचिन्ह; दहावीचा निकाल वैयक्तिक प्रगतीनुसार घोषित करा, शिक्षकांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सीबीएसई मंडळाने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी पद्धत आणि निकालाची संभाव्य तारीख जाहीर केली. मात्र, अद्याप राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनसंदर्भात काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा  फाॅर्म्युला कधी ठरणार, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शाळास्तरावर यंदाच्या दहावीच्या मूल्यमापनाची जबाबदारी सोपवावी, विद्यार्थ्यांच्या मागील काही वर्षांतील वैयक्तिक प्रगतीचा आलेख लक्षात घेऊन निकाल घोषित करावा, असे मत मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी मांडले.सीबीएसई मंडळाप्रमाणेच राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाच्या पद्धतीचा अवलंब होणार का, याकडे राज्यातील १६ लाख विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्य शिक्षण मंडळाला लवकरात लवकर स्वतःची अंतर्गत मूल्यमापन पद्धत व निकष जाहीर करावेच लागतील, तरच पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत मार्गी लागू शकेल, असे मत शिक्षकांनी मांडले.

सीबीएसई मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी, पालक सधन वर्गातील आहेत. मोबाइल, इंटरनेटची उपलब्धता असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची ऑनलाइन चाचणी, सहामाही परीक्षा झाली आहे. ऑनलाइन परीक्षा घेऊन व वेगवेगळ्या प्रकल्प देऊन मूल्यमापन झाले आहे. त्यामुळे त्यांचे निकाल तयार करणे या शाळेला सोपे जाणार असून, त्यांची पद्धती राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना तंतोतंत लागू होऊच शकत नसल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत.राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर कुठल्याही प्रकारच्या अधिकृत ऑनलाइन परीक्षा देता आल्या नाहीत, तसेच शहरी भागात १ली ते १० पर्यंत ४० ते ५० टक्केच विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणात सहभागी झाल्याचे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती याहून वाईट असून, त्या विद्यार्थ्यांना गुण कसे देणार, यांसारखे अनेक प्रश्न शिक्षक स्वतःच उपस्थित करत आहेत. या सगळ्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेल्या मागील तीन वर्षाचा प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल पाहून, त्याचे सरासरी गुण काढले, तर या विद्यार्थ्यांचे काही अंशी याेग्य मूल्यमापन करता येईल, तसेच त्यामुळे खोटे गुण न देता, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असे कुर्ल्याच्या शिशु विकास मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक वेताळ यांनी सांगितले.

मागील वर्षाशी तुलना करणे अशक्य!शाळास्तरावर अंतर्गत मूल्यमापनाचा निर्णय सोपा असला, तरी अनेक विद्यार्थी, पालकांनी याला विराेध केला. हा पर्याय खरेच गुणवत्तेला योग्य न्याय देऊ शकेल का, विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा म्हणून यंदा केलेली मेहनत परिश्रम याची मागील वर्षाशी तुलना होऊ शकत नाही. अनेक शाळांमधून शिक्षक, शाळेकडून निवडक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाssc examदहावीResult Dayपरिणाम दिवस