तिसरी ते सहावी इयत्तेसाठी सीबीएसईचा नवा अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 05:18 AM2024-03-24T05:18:50+5:302024-03-24T05:51:30+5:30

सीबीएसईचे संचालक (शैक्षणिक) जोसेफ इमॅन्युएल म्हणाले की, तिसरी ते सहावीसाठी ही नवी पुस्तके असतील.  एनसीईआरटीकडून साहित्य प्राप्त झाल्यानंतर ते सर्व शाळांना ऑनलाइन पाठविले जाईल. 

CBSE New Syllabus for 3rd to 6th Class | तिसरी ते सहावी इयत्तेसाठी सीबीएसईचा नवा अभ्यासक्रम

तिसरी ते सहावी इयत्तेसाठी सीबीएसईचा नवा अभ्यासक्रम

नवी दिल्ली : १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) तिसरी ते सहावी इयत्तेसाठी नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके प्रकाशित करणार आहे. इतर वर्गांच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीईएसई) संलग्न शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, एनसीईआरटीने त्यांना कळविले आहे की, इयत्ता तिसरी ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांवर काम केले जात आहे. लवकरच ते प्रकाशित केले जातील. सीबीएसईचे संचालक (शैक्षणिक) जोसेफ इमॅन्युएल म्हणाले की, तिसरी ते सहावीसाठी ही नवी पुस्तके असतील. 
एनसीईआरटीकडून साहित्य प्राप्त झाल्यानंतर ते सर्व शाळांना ऑनलाइन पाठविले जाईल. 

Web Title: CBSE New Syllabus for 3rd to 6th Class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.