शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CBIvsCBI: राफेलप्रकरणी आलोक वर्मा गुन्हा दाखल करणार होते; काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 01:24 IST

३ आॅक्टोबर रोजी रात्री आलोक वर्मा यांच्या दालनातून रात्री अडीच वाजता राफेल लढाऊ विमान घोटाळ्याचे दस्तऐवज गायब केले, कारण २४ आॅक्टोबर रोजी वर्मा या प्रकरणी एफआयआर दाखल करणार होते, असा दावा काँग्रेसने केला आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीव्हीसीचे के. व्ही. चौधरी, सीबीआयचे प्रभारी नागेश्वर राव आणि कार्मिक मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लोकरंजन यांनी ३ आॅक्टोबर रोजी रात्री आलोक वर्मा यांच्या दालनातून रात्री अडीच वाजता राफेल लढाऊ विमान घोटाळ्याचे दस्तऐवज गायब केले, कारण २४ आॅक्टोबर रोजी वर्मा या प्रकरणी एफआयआर दाखल करणार होते, असा दावा काँग्रेसने केला आहे.के. व्ही. चौधरी २३ रोजी डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार होते. त्याची मंजुरीही पंतप्रधानांनी दिली होती. पण, अचानक चौधरी यांनी डेन्मार्क दौरा रद्द का केला? सीव्हीसीचे कार्यालय रात्री ८ पासून ते रात्री १२ पर्यंत का खुले होते? कुणाच्या आदेशावरुन कार्यालय उघडण्यात आले? सीबीआयचे प्रभारी नागेश्वर राव यांना रात्री ११ वाजता कसे समजले की, सीव्हीसी आदेश जारी करून त्यांना सीबीआयचे प्रभारी केले जाणार आहे? असेही सवाल काँग्रेसने केले आहे.काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत आणि रणदीप सुरजेवाला यांनी दावा केला की, आलोक वर्मा यांनी २४ रोजी सकाळी राफेल प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची तयारी केली होती. याचा थेट संबंध पंतप्रधान मोदी यांच्याशी आहे. प्रथम दिल्ली पोलीस सीबीआय मुख्यालयावर ताबा घेण्यासाठी गेले.रात्री २.३० वाजता के. व्ही. चौधरी व लोकरंजन सीबीआय मुख्यालयात जातात आणि आलोक वर्मा यांच्या रुममधून दस्तऐवज उचलून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्यासोबत नागेश्वर रावही होते. रात्री अडीच वाजता आलोक वर्मा यांना दीर्घ सुटीवर पाठविण्यात आल्याचे कळविण्यात आले, असाही आरोप काँग्रेसने केला आहे.असा आहे घटनाक्रमरणदीप सुरजेवाला म्हणाले की, सीव्हीसी अ‍ॅक्टच्या कलम ८ अ नुसार २३ आॅक्टोबर रोजी रात्री ८ ते १२.३० च्या दरम्यान के. व्ही. चौधरी यांनी आलोक वर्मा यांना सुटीवर पाठविण्याचा आदेश जारी केला. तो रात्री १२.३० वाजता हा आदेश नॉर्थ ब्लॉकला पोहोचला. येथेच कार्मिक मंत्रालयाचे कार्यालय आहे.तिथे प्रतीक्षा करत असलेले सी. चंद्रमोळी यांच्या स्वाक्षरीने वर्मा यांना सुटीवर पाठविण्याचा आणि नागेश्वर राव यांना पदभार देण्याचा आदेश जारी झाला. हा आदेश १२ ते १२.३० च्या दरम्यान तयार करण्यात आला.११ ते १२ च्या दरम्यान त्याच रात्री मोदी यांनी नव्या नियुक्तीसाठी कॅबिनेटची बैठक बोलावून आदेशाला मंजुरी दिली.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस