शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात CBI ची मोठी अ‍ॅक्शन, माजी मुख्यमंत्र्याची मुलगी के कविता यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 4:06 PM

महत्वाचे म्हणजे, कविता या दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सहभागी असलेल्या दक्षिण गटाच्या सदस्य आहेत, असा आरोप ईडीने केला आहे.

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आज (गुरुवारी) सीबीआयने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांना अटक केली. त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने मंगळवारी (9 एप्रिल, 2024) भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के कविता यांची कोठडी 23 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.

तत्पूर्वी, सोमवारी न्यायालयाने कविता यांना अंतरिम जामीन देण्यासही नकार दिला. यावेळी, प्रथमदर्शनी असे दिसते की, त्यांनी साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. यामुळे त्यांना दिलासा दिल्यास त्या भविष्यातही असे करू शकतात, असे न्यायालयाने म्हटले होते. 

महत्वाचे म्हणजे, कविता या दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सहभागी असलेल्या दक्षिण गटाच्या सदस्य आहेत, असा आरोप ईडीने केला आहे.

ईडीचा दावा -  ईडीने म्हटले आहे, कविता या दक्षिण गटातील एक महत्त्वाच्या सदस्य आहेत. ज्यांच्यावर मद्य परवान्यात मोठा वाटा मिळावा यासाठी दिल्लीतील सत्ताधारी पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीला (आप) 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.

ईडीने आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हणत, पक्षातील अनेक नेते आणि मंत्रीही यात सामील असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, हे सर्व आरोप फेटाळून लावत, हे सर्व राजकीय सूडबुद्धीच्या भावनेने केले जात असल्याचे के कविता आणि आपने म्हटले आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावCourtन्यायालयArvind Kejriwalअरविंद केजरीवाल