शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CBI Vs CBI: निष्पक्ष चौकशीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले होते - अरुण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 13:15 IST

केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी)च्या शिफारसीनुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.

नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द करत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. आलोक वर्मांना पदावरून हटवण्यापूर्वी निवड समितीची सहमती मिळवणे गरजेचे आहे. आलोक वर्मा यांना अशाप्रकारे संचालक पदावरून हटविणे असंवैधानिक असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. 

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना अरुण जेटली म्हणाले की, निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआयच्या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठिवले होते. केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी)च्या शिफारसीनुसार अधिकाऱ्यांना रजेवर पाठविण्यात आले होते. सरकारने हा निर्णय योग्य पद्धतीने घेतला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन सरकार करेल. मात्र, हा निर्णय संतुलित आहे. तसेच, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत अद्याप आमच्याकडे आलेली नाही. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही.

दरम्यान, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि क्रमांक दोनचे अधिकारी राजेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने कारवाई करून आलोक वर्मा यांचे अधिकार काढून घेत त्यांना रजेवर पाठवले होते. या सक्तीच्या रजेविरोधात आलोक वर्मा यांनी कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटविण्याआधी निवड समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटविले, ते संविधानाच्या विरोधात आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केला.

याचबरोबर, आलोक वर्मा सीबीआयच्या संचालकपदी राहतील. मात्र, संचालकपदी असताना कोणतेही मोठे निर्णय ते घेऊ शकणार नाहीत. तसेच, त्यांच्याबाबतीत उच्च स्तरीय समितीने एका आठवड्यात निर्णय घ्यावा, असेही यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले.  

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीCBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालय