सीबीआय शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणार १० हजार कोटींचा घोटाळा :

By Admin | Updated: May 12, 2014 00:10 IST2014-05-11T19:34:31+5:302014-05-12T00:10:52+5:30

सीबीआय शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी लवकरच एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करणार आहे.

CBI to set up SIT for scam probe into Saradha scandal: | सीबीआय शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणार १० हजार कोटींचा घोटाळा :

सीबीआय शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणार १० हजार कोटींचा घोटाळा :

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी लवकरच एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करणार आहे.
या घोटाळ्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामच्या गुंतवणूकदारांचे कथित १० हजार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही एसआयटी सेबी आणि आरबीआयसारख्या बाजार नियमकांच्या भूमिकेची चौकशीदेखील करणार आहे.
या प्र्रकरणाच्या कायदेशीर बाबी निश्चित झाल्यानंतर एसआयटी स्थापन केली जाईल, असे सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा म्हणाले. दरम्यान सूत्राने सांगितले की, एसआयटी लवकर स्थापन होणे अपेक्षित आहे.
एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चिटफंड घोटाळा चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. तसेच न्यायालयाने संबंधित तीनही राज्यांच्या पोलिसांना सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.
याशिवाय सीबीआय न्यायालयाच्या निर्देशानुसार कंपनी कायद्यांतर्गत सेबी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका तपासणार आहे.
---
ईडीचे जुलैमध्ये पहिले एफआयआर
नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) येत्या जुलैमध्ये आपले पहिले एफआयआर दाखल करणार आहे.
ईडीच्या अलीकडच्या तपासात राजकारणी आणि शारदा ग्रुपमध्ये ७०० ते ८०० कोटी रुपयांच्या देवाण-घेवाणीचे दस्तऐवज सापडले आहेत.
ईडीने गेल्या काही आठवड्यापासून पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामच्या अनेक खासदार आणि राजकारणार्‍यांचे जबाब नोंदवणे सुरू केले आहे. या घोटाळ्यात जमाकर्त्यांनी २,५०० कोटी रुपये गमावले आहेत.
ईडी शारदाप्रकरणी यावर्षी जुलैला पहिला गुन्हा दाखल करणार आहे. हा एफआयआर आतापर्यंतचा तपास आणि नोंदविलेल्या जबाबच्या आधारावर राहणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
(वृत्तसंस्था)

Web Title: CBI to set up SIT for scam probe into Saradha scandal:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.