शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांच्या घरावर सीबीआयचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 11:29 IST

जमीन घोटाळ्याप्रकरणी दिल्ली-एनसीआरमधील 30 ठिकाणी सीबीआयचे छापे

चंदीगढ: हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या घरावर सीबीआयनं शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे. हुड्डा यांच्या रोहतकमधील निवासस्थानी सकाळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी हुड्डा घरातच होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या सीबीआयची कारवाई सुरू असून घरातील कोणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली-एनसीआरमधील 30 हून अधिक ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले आहेत. 2005 मध्ये असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडला चुकीच्या पद्धतीनं जमीन देण्यात आली होती. त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी हुड्डा यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केल्याचं वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे. सीबीआयनं भूपेंद्र सिंह हुड्डा, वरिष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल वोरा आणि असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांवर असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडला पंचकुलामध्ये नियम डावलून जागा दिल्याचा आरोप आहे. असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र चालवलं जातं. या प्रकरणाचा तपास भाजपा सरकारनं 2016 मध्ये सीबीआयकडे सोपवला. भाजपानं सत्तेत येण्याआधी यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. यानंतर सत्तेवर येताच या प्रकरणांची त्वरित चौकशी सुरू करण्यात आली. हरयाणा शहर विकास प्राधिकरणानं या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. राज्यात काँग्रेसची सत्ता असताना हुड्डा या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष होते. त्यामुळे हुड्डा यांच्याविरोधातील कारवाईला वेग आला आहे.  

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपाcongressकाँग्रेसCBIगुन्हा अन्वेषण विभाग