''सीबीआय तोता है'', विरोधकांच्या घोषणेनंतर राजनाथ सिंह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 13:21 IST2019-02-04T13:21:36+5:302019-02-04T13:21:47+5:30

ममता बॅनर्जी आणि सीबीआयच्या आडून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरून लोकसभेतही रणकंदन झालं आहे.

"CBI is parrot", Rajnath Singh said after the protesters' announcement ... | ''सीबीआय तोता है'', विरोधकांच्या घोषणेनंतर राजनाथ सिंह म्हणाले...

''सीबीआय तोता है'', विरोधकांच्या घोषणेनंतर राजनाथ सिंह म्हणाले...

नवी दिल्ली- ममता बॅनर्जी आणि सीबीआयच्या आडून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरून लोकसभेतही रणकंदन झालं आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं. राजनाथ सिंह निवेदन देत असताना तृणमूलच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सीबीआय तोता है, तृणमूलच्या खासदारांची घोषणाबाजी देत सभागृह दणाणून सोडला. त्यादरम्यान राजनाथ सिंह यांनी भाषण दिलं आहे. कायद्याच्या संस्थांना अटकाव करणं देशहितासाठी योग्य नाही. संस्थांना काम करण्यापासून रोखल्यास व्यवस्थेचे तीन-तेरा वाजतील. केंद्रानं नेहमीच राज्यांच्या अधिकारांचा सन्मान केला आहे.

पोलीस हे राज्यांतर्गत येतात. राज्यांनीही केंद्र सरकारच्या संस्थांचा सन्मान केला पाहिजे. कालची घटना ही संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवण्यासारखी आहे. राज्यपालांशी माझं बोलणं झालं असून, मी त्यांच्याकडून एक रिपोर्ट मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारी संस्थांना काम करण्यापासून रोखू नये, असंही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.


लोकसभेत राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, कोलकात्यात सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांचं काम करण्यापासून रोखण्यात आलं. अशी घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली आहे. चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना राजकीय संरक्षण दिलं जातंय.
सीबीआय या प्रकरणात तपास करत आहे. त्यामुळेच सीबीआयला आयुक्तांच्या घरी जावे लागले. या घोटाळ्यात नावाजलेल्या आणि राजकीय लोकांचा समावेश आहे. राजनाथ सिंह भाषण करत असतानाच तृणमूलच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. तृणमूल खासदारांच्या गदारोळानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. 

Web Title: "CBI is parrot", Rajnath Singh said after the protesters' announcement ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.