शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्यावर सीबीआयची लुकआऊट नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 5:18 AM

पश्चिम बंगालमधील शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्यावर सीबीआयने लुकआऊट नोटिस बजावली आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्यावर सीबीआयने लुकआऊट नोटिस बजावली आहे. त्यांना परदेशात जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. राजीवकुमार यांनी परदेशात जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखण्यात यावे व त्याबाबत सीबीआयला तत्काळ कळवावे अशा सूचना देशातील सर्व विमानतळ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. १९८९च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असलेले राजीवकुमार प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात. राजीवकुमार यांच्यावर शारदा चिट फंड व रोजवेली चिट फंड घोटाळ््याच्या तपासादरम्यान पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.राजीवकुमार यांना २३ मे रोजी लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. सीबीआयने स. न्यायालयाला सांगितले की, चौकशीत सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करणे आवश्यक आहे. तपास अधिकाऱ्यांनी चौकशीत विचारलेल्या प्रश्नांना ते उद्धटपणे उत्तरे देत आहेत. २५०० कोटी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ््यामध्ये गुंतलेल्या राजकीय व्यक्तींचे मोबाइल व लॅपटॉप परत देण्याचे आदेश त्यांनी विशेष तपास पथकाला दिले होते. हे मोबाइल व लॅपटॉप फोरेन्सिक तपासणीसाठीही पाठविण्यात आले नाही असे सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.>ममता बॅनर्जी यांचे खास विश्वासूराजीवकुमार यांच्यावरील कारवाई रास्त असून ती राजकीय हेतूने प्रेरित नसल्याची खात्री पटायला हवी असे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले होते. त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण १७ मे रोजी न्यायालयाने काढून घेतले व पुढील कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले. त्यावर वकीलांच्या संपामुळे पश्चिम बंगालमधील न्यायालयांतील कामकाज ठप्प झाल्याने अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत वाढवून मिळावी अशी विनंती राजीवकुमार यांनी २० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. जानेवारीत राजीवकुमार यांच्या चौकशीसाठी कोलकाता येथील निवासस्थानी गेलेल्या सीबीआय पथकालाच स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राजीवकुमार यांच्या समर्थनासाठी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारच्या विरोधात धरणे धरले होते.