शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सीबीआय, इडीचा गैरवापर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:57 IST

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांचा केंद्र सरकारवर आरोप

नवी दिल्ली : राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (इडी) यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा आरोप काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी सोमवारी राज्यसभेत केला.सभागृहात शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरामुळे देशात दहशत, भीती व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच गुन्ह्यासंदर्भात सीबीआय, महसुल गुप्तचर यंत्रणा, इडी यांच्याकडून वेगवेगळे एफआयआर नोंदविले जात आहेत. त्याकडे केंद्र सरकार डोळेझाक करत आहे. राजकीय सुड घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होता कामा नये. भ्रष्टाचार करण्यासाठी केलेली कृती व तसे करण्यासाठी घेतलेला अधिकृत निर्णय या दोन वेगळ््या गोष्टी आहेत. हा फरक घ्यायला हवा.काही लोकांना अडकविण्यासाठी त्यांनी दिलेल्या जबाबाचा हवा तसा अर्थ तपास यंत्रणा काढत आहेत, असा आरोप शर्मा यांनी केला.भाजपा खासदारांकडून जोरदार निषेधहे सांगताना आनंद शर्मा यांनी कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख करणे मात्र टाळले. मात्र त्यांच्या या उद्गारांचा भाजप खासदारांनी जोरदार निषेध केला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितले की, शर्मा हे तपास यंत्रणांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.आपल्यावर अन्याय होत आहे असे ज्यांना वाटते त्यांना त्याविरोधात दाद मागण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. असे असून देखील आनंद शर्मा तपासयंत्रणांचे खच्चीकरण का करत आहेत, अशी विचारणा राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही केली.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस