नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे (एनएमसी) अधिकारी तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांच्यात दलालांमार्फत असलेले लागेबांधे सीबीआयने उघडकीस आणले आहेत. या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार तसेच वैद्यकीय महाविद्यालयांवर नियंत्रण असलेल्या व्यवस्थेतील हेराफेरीचा यातून पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक झाली आहे.
३४ आरोपींचा समावेश
सीबीआयने एफआयआरमध्ये ३४ जणांची नावे असून यात आरोग्य मंत्रालयाचे ८ अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचा एक अधिकारी तसेच पाच डॉक्टरांचा समावेश आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अँड रिसर्चचे चेअरमन डी. पी. सिंह, गीतांजली युनव्हर्सिटीचे रजिस्ट्रार मयूर रावल, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चचे चेअरमन रविशंकरजी महाराज, इंडेक्स मेडिकल कॉलेजचे चेअरमन सुरेशसिंह भदौरिया यांचीही नावे यात समाविष्ट आहेत.