शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CBI Bribery Case : सीलबंद लिफाफ्यातील माहिती बाहेर आली कशी?, सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 12:48 IST

CBI Bribery Case : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांमधील वाद प्रकरणाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाकडून 29 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टात CVC अहवाल आणि त्यावर CBI संचालकांचे उत्तर यावरील सुनावणी टळली सीलबंद लिफाफ्यातील आलोक वर्मांचे उत्तर लीक झाल्यानं नाराजी29 नोव्हेंबरपर्यंत सुनावणीला स्थगिती

नवी दिल्ली - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांमधील वाद प्रकरणाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाकडून 29 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात सीव्हीसीच्या अहवालावर आपले उत्तर सादर केले. पण सीलबंद लिफाफ्यात असलेल्या अहवालातील गोष्टी उघड झाल्याच कशा?, असा प्रश्न उपस्थित करत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सीबीआयमधील अंतर्गत वादावर सीव्हीसीने सादर केलेला अहवाल आणि सुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांचे अहवालावरील उत्तर यावर आज कोर्टात सुनावणी होती. पण वर्मा यांनी सादर केलेले उत्तर मीडियामध्ये फुटले. यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ऑनलाइन पोर्टलवर वर्मा यांच्या उत्तराच्या आधारावर वृत्त देण्यात आले, यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे.  16 नोव्हेंबरला वर्मा यांना त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतच्या सीव्हीसी अहवालावर सुप्रीम कोर्टानं आपले उत्तर सादर करण्यास सांगितले. यावर वर्मा यांनी सोमवारी आपले उत्तर सादर केले.   

 

 

यापूर्वी शुक्रवारी सीबीआयमधील वादावर सुनावणी सुरू झाल्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सीव्हीसीच्या अहवालामध्ये आलोक वर्मा यांना स्पष्ट क्लीन चिट देण्यात आलेली नसल्याचे सांगितले. याबाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले होते की, ''सीव्हीसीच्या अहवालामध्ये आलोक वर्मांबाबत काही चांगल्या, काही सामान्य आणि काही प्रश्न उपस्थित करणाऱ्या बाबींचा उल्लेख आहे. अहवालातून उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांची चौकशी करण्याची गरज आहे.''  सुप्रीम कोर्ट सीबीआयची प्रतिष्ठा कायम राखू इच्छिते. त्यामुळे आम्ही सीलबंद लिफाफ्यातून सीव्हीसीचा अहवाल त्यांना सोपवला आहे. तसेच आम्हाला सीलबंद लिफाफ्यामधूनच त्याचे उत्तर हवे आहे, असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले होते.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालय