बाहुबलीतील सीसीटीव्ही मस्तकाभिषेकाच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल

By Admin | Updated: May 12, 2014 20:56 IST2014-05-12T20:56:39+5:302014-05-12T20:56:39+5:30

* बाहुबली संस्थेचा महत्त्वाचा निर्णय

Cavity is an important step in the cavity of Bahutali CCTV | बाहुबलीतील सीसीटीव्ही मस्तकाभिषेकाच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल

बाहुबलीतील सीसीटीव्ही मस्तकाभिषेकाच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल

*
ाहुबली संस्थेचा महत्त्वाचा निर्णय
* परिसराचे पावित्र्य टिकण्यास मदत

भरत शास्त्री
बाहुबली : भारतातील मोजक्या तीर्थक्षेत्रांपैकी बाहुबली या क्षेत्राचे जैन बांधवांमध्ये विशेष आकर्षण आहे. जैन बांधवांची दक्षिण काशी म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. बारा वर्षांपासून एकदा येथील महामूर्तीचा मस्तकाभिषेक केला जातो. यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मस्तकाभिषेक होणार असल्याची घोषणा संस्थेने केली आहे. त्यादृष्टीने अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी महत्त्वाचे काम म्हणजे संपूर्ण बाहुबली परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. संस्थेच्या विश्वस्त मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
हातकणंगले तालुक्यातील अत्यंत निसर्गरम्य परिसरात विसावलेले बाहुबली हे अतिशय क्षेत्र आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातून दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. परिसराच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून संपूर्ण तीर्थक्षेत्र परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
येथे १००८ भगवान बाहुबलींची २८ फूट उंचीची महामूर्ती आहे. शिवाय श्री महावीर समवसरण, स्वयंभू मंदिर, रत्नत्रय कीर्तीस्तंभ, आदी विविध मंदिरे एकाच परिसरात बांधली गेली आहेत. शिवाय चार जिनालय, मानस्तंभ, धर्मशाळा, आश्रम निवास, गुरुकुल कॅम्पस, आदी अनेक वास्तू आहेत. सध्या या परिसराचा विस्तार होत आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये बाल-शिशू वर्गापासून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागामार्फत विस्तार आहे. संस्थेचे सध्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. यामध्ये धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांशी निगडित कार्यक्रम होणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने १२ वर्षांतून एकदा होणार्‍या महामस्तकाभिषेकाची पूर्वतयारी अत्यंत जोमाने सुरू आहे. त्यादृष्टीने अनेक सोई व उपाययोजना करण्याच्यादृष्टीने काम सुरू आहे. सीसीटीव्ही बसविल्याने कायमस्वरूपी क्षेत्रावर सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जाते. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, महामंत्री व महामस्तकाभिषेक समितीचे कार्याध्यक्ष डी. सी. पाटील व सेक्रेटरी बी. टी. बेडगे यांच्या निर्देशनात कामे सुरू आहेत.

फोटो - बाहुबली (ता. हातकणंगले) येथील मंदिराचे विहंगम दृश्य.

Web Title: Cavity is an important step in the cavity of Bahutali CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.