शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सावधान: बाळाला लस टोचून घ्या, अन्यथा...; हा सर्व देशांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 05:40 IST

सावधान : बाळाला लस टोचून घ्या, अन्यथा...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर कोट्यवधी मुलांचे लसीकरण होत नसल्याने २०२१-२२ पासून गोवर या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जागतिक स्तरावर ४३ टक्क्यांनी वाढली असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अमेरिकी डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन सेंटर (सीडीसी)ने सादर केला आहे. २०२२ मध्ये ३७ देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवरचा उद्रेक झाला होता, तर २०२१ मध्ये अशा देशांची संख्या २२ होती. अजूनही मुलांना लसीकरण होत नसल्याने गोवरचा उद्रेक वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

भारतालाही मोठा धोका? जगभरात गोवरच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील ३.३ कोटी मुले लसीकरणापासून वंचित राहिली. २.२ कोटी मुलांनी पहिला डोस, तर १.१ कोटी मुलांनी दुसरा डोस चुकवला. या संसर्गजन्य रोगाविरुद्ध पहिली लस न घेतलेल्या मुलांची संख्या सर्वाधिक असलेल्या टॉप १० देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

हा सर्व देशांना इशारा...गोवरचा मृत्यूंमध्ये झालेली वाढ धक्कादायक आहे. गोवरचा वाढता उद्रेक सर्व देशांना इशारा आहे. गोवरमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी तातडीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे सीडीसीच्या जॉन व्हर्टेफ्यूईले यांनी म्हटले.

९५% चे गोवर निर्मूलनासाठीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन्ही डोस देण्यात जगातील एकाही देशाला यश आलेले नाही.

कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये धोकाnगेल्या वर्षी, ३७ देशांमध्ये गोवरचा उद्रेक झाला, त्यातील बहुतेक देश आफ्रिकेतील आहेत. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, गोवरमुळे मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. तेथे लसीकरण दर सर्वात कमी फक्त ६६ टक्के आहेत.n२०२२ मध्ये गोवर लसीचा पहिला डोस चुकवलेली अर्ध्याहून अधिक मुले फक्त अंगोला, ब्राझील, काँगो, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, मादागास्कर, नायजेरिया, पाकिस्तान आणि फिलीपिन्स या दहा देशांमधील आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स