दोघांचा आकस्मिक मृत्यू

By Admin | Updated: September 14, 2015 00:39 IST2015-09-14T00:39:04+5:302015-09-14T00:39:04+5:30

नागपूर : अमरावतीच्या एका तरुणासह दोघांचे संशयास्पद मृत्यू झाले. जरीपटका आणि इमामवाडा ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले.

The casual death of both | दोघांचा आकस्मिक मृत्यू

दोघांचा आकस्मिक मृत्यू

गपूर : अमरावतीच्या एका तरुणासह दोघांचे संशयास्पद मृत्यू झाले. जरीपटका आणि इमामवाडा ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले.
उमेश बेचेलाल पाल (वय ३२, रा.अमरावती) याची आई जरीपटक्यातील अंगुलीमाल नगरात राहाते. पोळ्यानिमित्त तो तिला भेटायला आला होता. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास तो त्याच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी मेयोत नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उमेशचा मृत्यू कसा झाला, ते स्पष्ट झाले नाही. या प्रकारामुळे त्याच्या नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला असून, जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अशाच प्रकारे अयोध्यानगरातील रहिवासी विजय प्रभाकर इंगोले (वय ४३) मेडिकल चौक गोल राऊंडमधील गार्डनमध्ये शनिवारी रात्री बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रवेश हरीश ढवळे (वय १९) यांच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
---

Web Title: The casual death of both