काटी रस्ता निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:27+5:302015-07-19T21:24:27+5:30

इंदापूर : वरकुटे खुर्द-मोहितेवस्ती (भरतवाडी) काटी या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी काटी येथील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते शरद काकडे यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडे केली आहे.

Cast road demand for poor job inquiry | काटी रस्ता निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

काटी रस्ता निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

दापूर : वरकुटे खुर्द-मोहितेवस्ती (भरतवाडी) काटी या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी काटी येथील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते शरद काकडे यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडे केली आहे.
या भागात वरकुटे खुर्द-काटी रस्त्याचे काम झालेले आहे. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची काकडे यांची तक्रार आहे. बीबीएमच्या लेअरमध्ये फक्त ६० मि.मी. खडी व कच व अल्पस्वरूपात डांबर वापरून ते पूर्ण केलेले आहे. कारपेटच्या कामात हलक्या दर्जाचे डांबर वापरण्यात आले आहे. त्यावर कच स्वरूपातील दगडाचा भुकटा वापरून रोलिंग करून सिलिकोट करण्यात आले आहे. गटार भराव्याचे काम करताना गटार चारी एकाच बाजूला घेण्यात आली आहे. चारीची खोली काही ठिकाणी सहा इंच, तर काही ठिकाणी तीन फूट अशी घेतली आहे. रस्त्याच्या मध्यापासून कुठे चार मीटरवर, तर कुठे उभ्या पिकाचे नुकसान करून सात मीटर अंतरापर्यंत चारी काढण्यात आली आहे. ही चारी अनेक ठिकाणी गॅप टाकून काढण्यात आली आहे.
ठेकेदाराने मोजमाप पुस्तकात असणारी मापे न धरता चुकीची मापे नोंदवून कामाची बिले काढलेली आहेत, असा काकडे यांचा दावा आहे. गुण नियंत्रण विभागाशी आर्थिक संधान बांधून खोटे टेस्ट रिपोर्ट घेण्यात आले आहेत. त्यामुळे विशेष पथकाद्वारे कामाची चौकशी करावी, अशी काकडे यांची मागणी आहे. दोषींवर कारवाई व्हावी, अपहार झालेली रक्कम वसूल करावी, अन्यथा १६ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Cast road demand for poor job inquiry