शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महुआ मोईत्रांनी मला संसदीय खात्याचा पासवर्ड दिला, 'कॅश फॉर क्वेरी वादात' व्यावसायिकाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 23:27 IST

उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी कबूल केले. 

नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारमहुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला आहे. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी तृणमूल काँग्रेस (TMC) खासदारमहुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी कबूल केले. 

एका स्वाक्षरी केलेल्या प्रतिज्ञापत्रात दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले की, महुआ मोईत्रा यांनी नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी गौतम अदानींवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या निष्कलंक प्रतिष्ठेमुळे विरोधकांना त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी मिळाली नाही. तसेच, केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचे दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले आहे. मात्र, महुआ मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानी यांचा दावा फेटाळून लावला आहे. त्या म्हणाल्या की, दर्शन हिरानंदानी यांनी सरकारच्या दबावाखाली हे वक्तव्य केले आहे. सरकारने त्यांचा व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, स्वाक्षरी केलेल्या प्रतिज्ञापत्रात दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले की, अदानींना टारगेट करण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर करण्यात आला होता. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी खासदाराच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचे दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. तसेच, महुआ मोईत्रा यांनी प्रश्न विचारण्याबद्दल अनेक मागण्या केल्याचा दावा दर्शन हिरानंदानी यांनी केला. यामध्ये महागड्या लक्झरी वस्तू, दिल्लीतील त्यांच्या वाटप केलेल्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी मदत, प्रवास आणि सुट्टीचा खर्च यांचा समावेश होता. याशिवाय, भारतामध्ये आणि जगाच्या विविध भागांमध्ये प्रवासासाठी लॉजिस्टिकल मदतही घेण्यात आली होती.

दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी लोकसभा सभापतींना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंबईतील एका व्यावसायिकाच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. तसेच, यानंतर निशिकांत दुबे यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पत्र लिहिले आहे.  या पत्राद्वारे निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवरील लॉगिनचा मुद्दा उपस्थित केला. निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेच्या वेबसाईटच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची चौकशी करण्याची मागणी केली.

मुंबईतील एका व्यावसायिकाच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. तसेच, यासाठी महुआ मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्या असून यासंदर्भात वकील जय अनंत देहाद्राई यांनीही आपल्याला पुरावे दिले आहेत, असे निशिकांत दुबे यांनी दावा केला होता. तसेच, महुआ मोईत्रा यांनी संसदेत एकूण ६१ पैकी ५० प्रश्न विचारले, जे सुरक्षेशी संबंधित होते, असे भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले होते. याशिवाय, ही बाब अत्यंत गंभीर आहे. जे पैशाच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारण्याशी संबंधित १२ डिसेंबर २००५ च्या 'कॅश फॉर क्वेरी' एपिसोडची आठवण करून देते. यामध्ये ११ खासदारांचे सदस्यत्व गमवावे लागले होते, असे निशिकांत दुबे म्हटले होते.

टॅग्स :Member of parliamentखासदारTrinamool Congressतृणमूल काँग्रेसbusinessव्यवसायMahua Moitraमहुआ मोईत्रा