शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महुआ मोईत्रांच्या बँक खात्यात किती पैसे आहेत? उद्या समितीसमोर चौकशी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:28 IST

महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीने २ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारमहुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीने २ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. दरम्यान, ५ नोव्हेंबरनंतर चौकशीसाठी हजर राहण्याची महुआ मोईत्रा यांनी आचार समितीकडे परवानगी मागितली होती. मात्र, ती परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना २ नोव्हेंबरला नियोजित वेळेवर म्हणजेच सकाळी ११ वाजता आचार समितीसमोर चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे.

दरम्यान, महुआ मोईत्रा यांच्या एकूण संपत्तीबाबतही विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, २०१३-१४  या आर्थिक वर्षात महुआ मोईत्रा यांचे उत्पन्न १ लाख ९२ हजार ६०० रुपये होते. त्यानंतर महुआ मोईत्रा यांची कमाई ५ लाख ३३ हजार ७० रुपये झाली. यानंतर २०१५-१६ या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न ५ लाख ३४ हजार ५३० रुपये होते, तर २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही रक्कम वाढून ८ लाख ३७ हजार १५६ रुपये झाली आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाढून ९ लाख ९९ हजार ९० रुपये झाली.

कोणत्या बँकेत किती रुपये?निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, माहिती देताना महुआ मोईत्रा यांच्याकडे ५ हजार रुपये रोख होते. तसेच, यामधील माहितीत महुआ मोईत्रा यांची देशातील तसेच परदेशातील बँकांमध्ये खाती असल्याचे सांगण्यात आले आहे. लंडन बँकेतील सर्व खात्यांपैकी १ लाख ३० हजार ७८२ रुपये आहेत. तर देशातील कोलकाता येथील गरियाहाट येथील एका बँक खात्यात १ कोटी १२ लाख १२ हजार ३५ रुपये आहेत. याशिवाय, महुआ मोईत्रा यांच्याकडे हिऱ्यापासून सोन्या-चांदीपर्यंतचे सर्व दागिने आहेत. २५ लाख रुपयांचा एक आर्ट पीस आहे. एकूण रक्कम २ कोटी ६४ लाख ९५ हजार २५० रुपये आहे.

कर्जाची रक्कम किती ?तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार  महुआ मोईत्रा यांच्यावरही काही कर्ज आहे. यासंदर्भात माहिती देण्यात आली, त्यावेळी त्यांच्यावर बँकेतील कर्जाची थकबाकी ६ लाख ७१ हजार १३८ रुपये ४० पैसे होती. मात्र, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. 

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राMember of parliamentखासदारlok sabhaलोकसभाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस