उनाव बलात्कार प्रकरणी सीबीआय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:44 IST2018-04-12T03:44:25+5:302018-04-12T03:44:25+5:30

उत्तर प्रदेशच्या उनाव येथील अठरा वर्षांच्या तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

In the case of Unnao rape, CBI should investigate | उनाव बलात्कार प्रकरणी सीबीआय चौकशी करा

उनाव बलात्कार प्रकरणी सीबीआय चौकशी करा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या उनाव येथील अठरा वर्षांच्या तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोप या युवतीने केला आहे.
बलात्कारित युवतीचे वडील पप्पूसिंग यांचा पोलीस कोठडीत सोमवारी संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे. एका वकिलाने स्वयंप्रेरणेने ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली असून, अ‍ॅमिकस क्युरीची नियुक्ती केली आहे.
>अत्याचारांबद्दलही मोदींनी उपोषण करावे
या घटनेने माणुसकीला काळिमा फासला गेला आहे. अत्यंत शरम वाटावी अशी ही गोष्ट आहे, असे टिष्ट्वट काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केले. भाजपच्या राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, कायद्याची हतबलता याबद्दलही पंतप्रधान लवकरच उपोषण करतील अशी आशा आहे, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे.

Web Title: In the case of Unnao rape, CBI should investigate