शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या पुतळ्यावर झाडल्या गोळ्या, हिंदू महासभेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 11:45 IST

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर एअर पिस्तुलनं गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला कार्यकर्त्यासहीत 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या प्रतिमेवर झाडल्या गोळ्याहिंदू महासभेच्या 13 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

नवी दिल्ली - महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर एअर पिस्तुलनं गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला कार्यकर्त्यासहीत 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलीस आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.  

बुधवारी (30 जानेवारी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहिली जात असताना हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी विकृतीचा कळस गाठत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. तसेच त्यांच्या प्रतिमेचे दहनही केले.  यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करत मिठाईचे वापट करण्यात आले. 'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे'च्या घोषणाही दिल्या गेल्या. उत्तर प्रदेशातील अलीगड येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

या घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाई करण्यास सुरुवात केली. हिंदू महासभेच्या महिला नेता पूजा पांडेयसहीत 13 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ''महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.''असे संतापजनक वक्तव्यही पूजा  शकून पांडेय हिने केले. दरम्यान, या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच विविध विचारवंतांसह, सर्वसामान्यांकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसेUttar Pradeshउत्तर प्रदेश