शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

नीरव मोदी प्रकरणी ईडीची न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:31 AM

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा तपास करणाºया सक्तवसुली संचालनालयाला (ईडी), नीरव मोदीची परदेशातील संपत्ती व व्यवसायाची चौकशी करायची आहे.

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा तपास करणाºया सक्तवसुली संचालनालयाला (ईडी), नीरव मोदीची परदेशातील संपत्ती व व्यवसायाची चौकशी करायची आहे. त्याबद्दल संबंधित देशांकडून माहिती मिळावी, याकरिता ईडीनेड विशेष पीएमएलए न्यायालयाला ‘लेटर आॅफ रोगेटरी’ (एलआर) देण्याची विनंती सोमवारी केली.प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत एलआर काढण्यासाठी ईडीने हा अर्ज केला. हाँगकाँग, यूएसई, युके, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूर या देशांत नीरव मोदीची संपत्ती आहे. तो या देशांत व्यवसाय करत होता. त्यामुळे या गुुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे संबंधित देशांकडून मिळावी, याकरिता एलआर काढावे, अशी विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली.न्या. एम. एस. आझमी यांनी ईडीचा युक्तिवाद ऐकला. ‘नीरव मोदी याने अनेक फर्म स्थापन केल्या. तो अनपॉलिश हिरे खरेदी करून, त्यांना पॉलीश करत असे. त्याचे दागिने करून विकत असे किंवा नुसता हिराही विकत असे. त्याने त्याचा कारभार हाँगकाँग, यूएसई, यूके, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूरमध्ये पसरविला. पीएनबीने त्याच्या फर्म्सच्या नावावर दिलेल्या अंडरटेकिंगचा वापर करून, त्याने अनेक व्यावसायिकांशी व्यवहार करून त्याचे पैसे दिले. मात्र, त्याने बँकेला फसवून व्यवहार केला.मोदीच्या फर्म्सला अंडरटेकिंग दिल्याचे बँकेच्या दप्तरी नोंद नाही. मोदीने फसवणूक व षड्यंत्र रचून बँकेला लुटले, असे ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय