केजरीवालाविरुद्ध अब्रू नुकसानीचा खटला
By Admin | Updated: June 6, 2014 22:27 IST2014-06-06T22:27:37+5:302014-06-06T22:27:37+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आरोप मागे घेण्यास नकार दिल्यामुळे दिल्ली न्यायालयाने अब्रू नुकसानीचा खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

केजरीवालाविरुद्ध अब्रू नुकसानीचा खटला
>प्रक्रिया सुरू : नितीन गडकरी यांची माघारीस सशर्त तयारी
नवी दिल्ली : आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आरोप मागे घेण्यास नकार दिल्यामुळे दिल्ली न्यायालयाने अब्रू नुकसानीचा खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महानगर दंडाधिकारी गोमती मानोचा यांनी प्रारंभी हा वाद सामोपचाराने सोडविण्याचा सल्ला दिला. गडकरींनी केजरीवाल आरोप मागे घेणार असतील तर तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शविली; मात्र केजरीवाल ठाम राहिले. त्यानंतर न्यायालयाने आरोप निश्चित करण्यासह कलम 251 नुसार समन्स पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली असून 2 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणीच्या वेळी गडकरी आणि त्यांच्या साक्षीदारांची जबानी नोंदविली जाईल. केजरीवाल यांनी देशातील सर्वात भ्रष्ट नेत्यांची यादी जारी करताना गडकरींचा समावेश केला होता. गडकरी हे भ्रष्ट राजकारणी असून जनतेने त्यांना मतदान करताना विचार करावा असे विधान केजरीवाल यांनी 3क् जानेवारी 14 रोजी केले व ते प्रसिद्ध झाले होते, असे न्यायदंडाधिका:यांनी म्हटले. केजरीवालांनी वैयक्तिकरीत्या हजर न राहण्याची सवलत मागितली असून ती न्यायालयाने मान्य केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4न्यायालयात हजर झालेले गडकरी म्हणाले की, प्रामाणिकपणा हीच माझी राजकीय शक्ती असून माङया प्रतिष्ठेचे भांडवल आहे. मी प्रामाणिक राजकारणी आहे. केजरीवाल यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे माङया प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. केजरीवाल यांच्याशी माङो वैयक्तिक वैर नाही.