नरेश दोरादो खून प्रकरणात महे
By Admin | Updated: June 13, 2014 06:58 IST2014-06-12T23:47:57+5:302014-06-13T06:58:47+5:30
श्वरी यांची साक्ष

नरेश दोरादो खून प्रकरणात महे
श्वरी यांची साक्ष
मडगाव : चिखली येथील नरेश दोरादो खून प्रकरणात गुरुवारी हैदराबाद येथील केंद्रीय प्रयोगशाळेचे भैतिक शास्त्राचे एम. महेश्वरी यांची साक्ष झाली. दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष वंदना तेंडुलकर यांनी ही साक्ष नोंदवून घेतली.
७ सप्टेंबर २0१२ ते १२ सप्टेंबर २0१२ दरम्यान आपण एक चाकू ठेवण्याचा स्टँण्ड व चाकूची या गुन्हयात तपासणी केली. सदर वस्तु गुरुवारी महेश्वरी यांनी न्यायालयात ओळखल्या. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी त्यांची सरतपासणी घेतली.
वास्कोचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ब्राझ मिनेझिस यांनी केलेल्या तपासकामानुसार खुनाची ही घटना चिखली येथील शेलॉम क्रँस्ट इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील सदनिकेत २ ऑगस्ट २0१0 च्या मध्यरात्री घडली होती. नॉन - मॉन , वास्को येथील स्नेहल डायस या संशयितने नरेशच्या गळयात चाकू खुपसून खून केला होता. नरेश याच्या फ्लॅटमधून लॅटॉप, हार्डडिस्क, विदेशी चलन, कॅमेरा व अन्य वस्तु लंपास झाल्या होत्या. या प्रकरणात ४५ साक्षिदारांची जबानी पुर्ण झालेल्या आहेत. ३ सप्टेंबर २0१0 पासून स्नेहल हा कोठडीत आहे. (प्रतिनिधी)