धान्य अपहार प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांसह दोघांना अटक

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:13+5:302015-02-14T23:51:13+5:30

सुरगाणा : येथील शासकीय धान्य गुदामाच्या नावाने नाशिक येथून उचलणे, धान्य परस्पर खुल्या बाजारात विक्री करून तब्बल सहा कोटींपेक्षा जास्त रकमेच्या झालेल्या अपहार प्रकरणी शुक्रवारी रात्री अकरा वाजता तत्कालीन तहसीलदारासह अन्य दोघांसंशयिताना पोलिसांनी अटक केली आहे.

In the case of grain abduction, both of them arrested along with the then Tehsildars | धान्य अपहार प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांसह दोघांना अटक

धान्य अपहार प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांसह दोघांना अटक

रगाणा : येथील शासकीय धान्य गुदामाच्या नावाने नाशिक येथून उचलणे, धान्य परस्पर खुल्या बाजारात विक्री करून तब्बल सहा कोटींपेक्षा जास्त रकमेच्या झालेल्या अपहार प्रकरणी शुक्रवारी रात्री अकरा वाजता तत्कालीन तहसीलदारासह अन्य दोघांसंशयिताना पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या सुमारे तीस हजार क्विंटल धान्य वाहतुकदार व गुदामपाल यांनी संगनमत करून अपहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गोदामपाल रमेश भोये यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात धान्य अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. भोये यांचे तत्काळ निलंबन झाल्यानंतर त्यावेळी कार्यरत असलेले तहसीलदार रशिद ईस्माईल तडवी यांचेही निलंबन झाले होते. गेल्या चार महिन्यांपासून सदर धान्य घोटाळा सुरू असताना तत्कालीन तहसीलदार तडवी यांना हा एवढा मोठा प्रकार कसा लक्षात आला नाही. त्याचवेळी तडवी यांनी जबाबदारी पाळली असती, तर त्यांचे निलंबन झाले नसते अशी चर्चा असून, झालेल्या या एवढ्या मोठ्या घोटाळ्याप्रकरणी रशीद तडवी यांच्यासह शिंदे-पळसे येथील चालक हेमंत चौधरी व दिंगबर पवार (बुबळी, ता. सुरगाणा) या तिघांनाही शुक्रवारी रात्री अकरा वाजता पोलिसांनी अटक केली. या गुन्‘ाचा तपास करीत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ यांनी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश श्रीमती गडकरी यांनी या तिघांनाही २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या तिघाही संशयिताविरोधात जीवनाश्यक वस्तू कायदा कलमान्वये व सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेशाचे उल्लंघन अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोट : तत्कालीन तहसीलदार रशिद तडवी यांचा नोकरीचा कार्यकाल पूर्ण होण्यास अवघे दोन महिने बाकी होते. ३० एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त होणार होते; मात्र केवळ कर्तव्य पार पडण्यास कसूर केल्यामुळे त्यांना निलंबित व्हावे लागले.

Web Title: In the case of grain abduction, both of them arrested along with the then Tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.