फसवणूक प्रकरणी सातपूरला गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
नाशिक : बनावट नाव धारण करून डीडी तयार करून दहा लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

फसवणूक प्रकरणी सातपूरला गुन्हा दाखल
न शिक : बनावट नाव धारण करून डीडी तयार करून दहा लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मीना घनशाम शर्मा (रा़राजस्थान) यांची पिंपळगाव बहुला येथे गट क्रमांक १९७ मध्ये प्लॉट नंबर ५० असा भूखंड आहे़ संशयित नवनाथ विश्वनाथ काशिद, शंकर विश्वनाथ काशिद (रा़उमाकुंज सोसायटी, सातपूर), जॉन्सन थॉमस (रा़ठक्कर इस्टेट, गंगापूररोड) व सुनील शिवराय परदेशी (रा़चाळीसगाव) यांनी संगनमत करून धनशाम घोडमल चंद्रा (रा़हरिनगर सुरत) असे बनावट नाव धारण केल़ेमीना यांच्या वडिलांच्या नावाने बनावट आयकार्ड, रेशनकार्ड, मतदानकार्ड तयार केले़ तसेच वडिलांच्या नावावर असलेल्या हा भूखंडाचे खोटे खरेदी खत तयार करून खरेदीचे पैसे जनलक्ष्मी बँकेचा डीडी तयार करून ते पैसे वडिलांच्या नावावर दाखवून दिल्याचे भासवले़ (प्रतिनिधी)