शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
2
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
3
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
4
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
5
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
6
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
7
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
8
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
9
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
10
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
11
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
13
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
14
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
15
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
16
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
17
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
18
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
19
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
20
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर जाताना कॅब चालकाला लागली झोप; कार धडकल्याने व्यावसायिकाचा मृत्यू, ड्रायव्हर वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:03 IST

नोएडात एका व्यावसायिकाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Noida CEO Accident: नोएडामधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर कॅबने जाणाऱ्या नोएडाच्या एका व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू झाला. डीएनडी फ्लायओव्हरवर व्यावसायिकाची कॅब एका ट्रकला धडकली आणि त्याचा मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर बचावला आहे. ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप व्यावसायिकाच्या कुटुंबियांनी केला. व्यावसायिकाच्या कुटुंबाने उबर कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तर ड्रायव्हरने टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.

मृत व्यावसायिकाचे नाव ५९ वर्षीय राकेश कुमार असे आहे. ते नोएडा सेक्टर ३५ मधील गरिमा विहार येथे राहत होते. ते टेक्नोकॉन्सेप्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे सीईओ होते. २१ जून रोजी पहाटे शनिवारी ही घटना घडली. राकेश यांना एका बिझनेस मीटिंगसाठी बंगळुरूला जायचे होते. म्हणून त्यांनी पहाटे ४ वाजता आयजीआय विमानतळावर पोहोचण्यासाठी उबरवरून कॅब बुक केली होती. मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने गाठलं.

दिल्ली नोएडा डायरेक्ट (डीएनडी) उड्डाणपूलावरील टोल प्लाझाजवळ हा सगळा प्रकार घडला. प्रवास सुरु केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांची गाडी रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. गाडी चालवताना चालकाला झोप लागली आणि हा अपघात झाला असा आरोप राकेश कुमार यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीने राकेश कुमार यांचे लोकेशन पाहिल्यानंतर त्यांना या अपघाताची माहिती मिळाली.

"सुरुवातीला काय झाले ते आम्हाला समजले नाही. माझ्या आईने वडिलांना अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. मी त्यांचे लोकेशन पाहिलं. मला कळलं की ते अजूनही डीएनडी फ्लायओव्हरवर आहेत. आम्ही घटनास्थळी पोहोचले तेव्हा टोलजवळ एका ट्रकच्या मागच्या बाजूला गाडी अडकलेली दिसली. तिथे जाऊन पाहिलं तेव्हा लोकांनी सांगितले की एक माणूस आत अडकला आहे. गाडीत माझे वडील होते, त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले," असं राकेश कुमार यांच्या मुलीने सांगितले.

अपघातातून वाचलेल्या चालक सुधीरने सांगितले की हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. पण राकेश कुमार यांच्या मुलीने म्हटलं की, "रस्त्याने जाणाऱ्यांनी मला सांगितले की चालकाने त्याला झोप आल्याचे मान्य केलं होतं. मी सर्व टायर्ससह गाडीचे फोटोही पोलिसांना पाठवले आहेत. अपघातानंतर उबरने आमच्याशी संपर्क साधला नाही. अॅपने कोणतेही स्पष्टीकरण न देता आयजीआय विमानतळावरून एम्स असे लास्ट लोकेशन दाखवले." अपघातानंतर काही तासांनी, सकाळी ११ वाजताच्या सुमारास ड्रायव्हरने अॅप राईड संपल्याचे मार्क केले. जर चालक बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून होता तर कंपनीने याकडे लक्ष द्यायला हवं होतं असंही कुटुंबियांनी म्हटलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात