केरळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कारमध्ये स्फोट

By Admin | Updated: November 1, 2016 15:18 IST2016-11-01T15:08:25+5:302016-11-01T15:18:49+5:30

मलप्पुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाला

A car bomb exploded near the Collector Office in Kerala | केरळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कारमध्ये स्फोट

केरळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कारमध्ये स्फोट

ऑनलाइन लोकमत

केरळ, दि. 1 - मलप्पुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाला.  दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला आहे.
 
दरम्यान,  या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, हा  स्फोट इतका तीव्र होता की यामुळे पार्किंगमधील अनेक गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळी श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथक दाखल झाले आहे. स्फोट नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला याचा तपास सध्या सुरू आहे.
 
 

Web Title: A car bomb exploded near the Collector Office in Kerala