शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कॅप्टनचे विरोधक तर राहुल गांधींचे निकटवर्तीय, कोण आहेत चरणजीत सिंग चन्नी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 18:36 IST

Punjab new CM: काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे.

चंदीगढ:पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. पण, आता अखेर यावरचा सस्पेन्स संपला आहे. दोन दिवसांच्या विचारमंथन आणि बैठकांनंतर पक्षानं चरणजीत सिंग चन्नी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतानाही चरणजीत सिंग चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. तर, जाणून घ्या कोण आहेत चरणजीत सिंग चन्नी.

गांधी कुटुंबाशी आहे जवळचे संबंधकॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक नवज्योतसिंग सिद्धू आणि सुखजिंदरसिंग रंधवा यांच्याशिवाय  सुनील जाखड, प्रताप सिंह बाजवा यांची नावे चर्चेत होती. पण, रविवारी सकाळी अचानक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांचे नाव समोर आले. पण, प्रकृतीचे कारण देत सोनी यांनी मुख्यमंत्री पदासाठी नकार दिला. त्यानंतर दुपारपर्यंत सुखजिंदर सिंग रंधावा यांचं नाव जवळपास निश्चित मानल जात होत. पण, पक्षाने या सर्व मोठ्या नेत्यांना बाजुला करत शर्यातीत नसलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. चन्नी हे गांधी कुटुंबाचे जवळचे मानले जातात.

अमरिंदर सिंग यांचे विरोधकचरणजीत सिंग चन्नी हे काँग्रेसचा पंजाबमधील दलित चेहरा आहे. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय होते, पण नंतर ते कॅप्टन यांच्या विरोधात गेले. 2017मध्ये चन्नी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री बनले होते. ते स्वत: 12 वी पास आहेत, त्यामुळे त्यांच्या पदाबाबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी 2017मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली होती. 

चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदारचरणजीत सिंग चन्नी हे पंजाब राज्यातील चमकौर साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या चरणजीत सिंग यांचा सुमारे 12,000 मतांनी पराभव केला होता. त्यापूर्वी 2012 च्या निवडणुकीत त्यांनी सुमारे 3600 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. चरणजीत सिंग चन्नी हे युवक काँग्रेसशीही जोडलेले आहेत. त्याच काळात ते राहुल गांधींच्या जवळ आले.

पंजाब काँग्रेसचा दलित शीख चेहराचरणजीत सिंग चन्नी पंजाब काँग्रेसमधील महत्त्वाचा दलित शीख चेहरा मानले जातात. भारतात पंजाबमध्ये सर्वात जास्त दलित शीख आहेत. त्यांची संख्या सुमारे 32% आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, दलित शीख चेहरा असल्यामुळे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांना मुख्यमंत्री केलं आहे.

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेस