स्वतंत्र विदर्भासाठी राजधानीत धरणे
By Admin | Updated: July 25, 2014 01:58 IST2014-07-25T01:58:03+5:302014-07-25T01:58:03+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भातून आलेल्या शेकडो आंदोलकांनी घोषणा, दमदार वातावरण निर्मिती व भाषणांनी गुरुवारी जंतरमंतर दणाणून सोडले.

स्वतंत्र विदर्भासाठी राजधानीत धरणे
नवी दिल्ली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भातून आलेल्या शेकडो आंदोलकांनी घोषणा, दमदार वातावरण निर्मिती व भाषणांनी गुरुवारी जंतरमंतर दणाणून सोडले. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, असे लिहिलेल्या शेकडो काळ्या-पांढ:या टोप्या, विदर्भाचा नकाशा चितारलेले शेकडो पांढरे ङोंडे, भगव्या रंगाच्या साडय़ा नेसून असलेल्या महिला असे वातावरण जंतरमंतरवर दिवसभर होते. विशेष म्हणजे, लांबलेल्या मान्सूननंतर आता कुठे विदर्भात पाऊस कोसळत असताना मोठय़ा संख्येने आलेले शेतकरी पाहून आंदोलनाला समर्थन देणा:या सा:यांनीच आश्चर्य व्यक्त केले.
विदर्भ राज्य आंदोलन समिती, नवराज्य निर्माण महासंघाच्यावतीने दुपारी 12 वाजतापासून धरणो देण्यात आले. या आंदोलनाचे प्रमुख अॅड. वामनराव चटप, आंदोलनाचे निमंत्रक राम नेवले, समितीचे नेते प्रबीरकुमार चक्रवर्ती यांनी आंदोलनाचे नियोजन केले होते. तेलंगणचे खासदार विनोद रावरेड्डी, ए.पी जितेंद्र रेड्डी यांनी आंदोलनस्थळी येऊन समर्थन दिले. भाजपाचे खासदार रामदास तडस, नाना पटोले, अशोक नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, बहुजन रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांनी पाठिंबा जाहीर केला. भाजपाच्या खासदारांनी आपण ही मागणी लोकसभेत रेटून नेऊ, असे आश्वासन दिले. (विशेष प्रतिनिधी)
इच्छामरणाचे राष्ट्रपतींना निवेदन
शेतक:यांच्या आत्महत्यांनी विदर्भ गाजत असताना, हा मुद्दा राष्ट्रीय होत नाही. सरकार शेतक:याची दखल घेत नाही. तेथील शेतक:यांची स्थिती नाजूक बनली आहे. सावका:यांच्या कचाटय़ातून शेतकरी सुटलेला नाही, कापसाला नीट भाव मिळत नाही, ही मागणी घेऊन विदर्भातील 91 शेतक:यांनी इच्छामरणाची मागणी असणारे निवेदन राष्ट्रपतींकडे सोपविले. हे सर्व जण धरणो कार्यक्रमात सहभागी होते.