शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 16:30 IST

Supreme Court on RG Kar case Today : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने महिला डॉक्टरांची नाईट शिफ्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी अधिसूचनाही काढण्यात आली. यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले.  

Supreme Court on Kolkata Case : कोलकातामधील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे सरकार टीकेचे धनी ठरत आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारने महिला डॉक्टरांची नाईट शिफ्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान पिळले. 

आरजी कर रुग्णालयातील बलात्कार, हत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (१७ सप्टेंबर) सुनावणी झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ममता बॅनर्जींच्या सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून फटकारले.

सर्वोच्च न्यायालयात काय झाले?

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर प्रकरणावर सुनावणी झाली. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांना सरन्यायाधीशांनी सुरक्षेचा मुद्दा सोडवावा लागेल, असे सांगितले. 

सरन्यायाधीश म्हणाले, "पश्चिम बंगाल सरकारने या अधिसूचनेत बदल करायला हवा. सुरक्षा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही महिलांना नाईट ड्यूटी करण्यापासून रोखू शकत नाही. पायलट आणि लष्करात जवान रात्री सुद्धा काम करतात."

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने सादर केलेल्या तपास अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सीबीआयचा स्टेटस रिपोर्ट चिंताजनक आहे. सीबीआयने या प्रकरणात नव्याने स्टेटस रिपोर्ट सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले. 

कामावर परतण्यास अडचण नाही

सुनावणी दरम्यान, ज्युनिअर डॉक्टरांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, आम्हाला कामावर परतण्यास कोणतीही अडचण नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत यासंदर्भात बैठक झाली आहे. 

फोटो हटवण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान विकीपीडियाला पीडित महिला डॉक्टरचे नाव आणि फोटो हटवण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, "बलात्कार पीडितेची ओळख जाहीर होता कामा नये." या प्रकरणावर पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर होणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्री