शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Singh: 'दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही'; पंतप्रधानांनी वाहिली कल्याण सिंह यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 22:55 IST

Kalyan Singh : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी झालं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दु:ख.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी झालं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दु:ख.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होती. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही डॉक्टरांच्या संपर्कात होते. परंतु शनिवारी रात्री कल्याण सिंह यांची प्राणज्योत मालवली. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. 

"मी माझं दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही. कल्याण सिंह हे राजकारणी, अनुभवी प्रशासक आणि महान व्यक्ती होते. उत्तर प्रदेशच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. मी त्यांचे सुपुत्र राजवीर सिंह यांच्याशीही संवाद साधला आणि शोक व्यक्त केला," असं ट्वीट पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं आहे.विचारधारेपुढे सत्ता किती गौण आहे, ही शिकवण कल्याण सिंहजी यांनी आम्हाला दिली - नितीन गडकरी आदरणीय कल्याण सिंहजी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. उत्तर प्रदेशात जनसंघ आणि भाजप उभा करण्यात कल्याण सिंहजी यांचे सर्वात महत्वाचे योगदान आहे. विचारधारेपुढे सत्ता किती गौण आहे, ही शिकवण कल्याण सिंहजी यांनी आम्हाला दिली. समर्पित राम भक्त, मातीशी नाळ असणारे खरे लोकनेते कल्याण सिंहजी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

अमित शाहंनीही वाहिली श्रद्धांजलीकल्याण सिंह यांच्या निधनामुळे देशानं एक खरा राष्ट्रभक्त, प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ राजकारणी गमावला आहे. बाबूजी हे एक असे विराट वटवृक्ष होते, ज्यांच्या भाजपचं संघटन अधिक वाढलं. राष्ट्रवादाचे खरे उपासक म्हणून त्यांनी जीवनभर देशाची आणि जनतेची सेवा केली असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.लोकसभा अध्यक्षांकडूनही श्रद्धांजलीकल्याण सिंह यांच्या निधनानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली. "कल्याण सिंह यांच्या माध्यमातून आम्ही असं विराट व्यक्तीमत्व पाहिलं ज्यांनी आपल्या राजकीय कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि विकासाभिमुऱ दृष्टीकोनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर एक छाप सोडली. इश्वर त्यांच्या आत्म्यास शआंती देवो," असं म्हणत बिर्ला यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं निधन

अलीगढमध्ये झाला होता जन्म५ जानेवारी १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढमधी अतरौली तहसीलातील मढौली गावात कल्याण सिंह यांचा जन्म झाला होता. कल्याण सिंह यांची ओळख एक हिंदुत्ववादी नेते आणि प्रखर वक्ते अशी होती. राम मंदिर आंदोलनातही सर्वात मोठ्या चेहऱ्यापैकी ते एक होते.

युपीत भाजपचे पहिले मुख्यमंत्रीकल्याण सिंह यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. ते उत्तर प्रदेशातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. २४ जून १९९१ ते ६ डिसेंबर १९९२ असा त्यांचा पहिला कार्यकाळ होता आणि २१ सप्टेंबर १९९७ पासून १२ नोव्हेंबर  १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ होता. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा अतरौली येथून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते १० वेळा आमदार म्हणून निवडून गेले. ४ सप्टेंबर २०१४ ते ८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान ते राजस्थानचे राज्यपालही होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानlok sabhaलोकसभाom birlaओम बिर्लाTwitterट्विटरBJPभाजपा