उमेदवारांना जाहीर करावे लागणार कुटुंबीयांच्याही उत्पन्नाचे स्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:29 IST2018-02-17T00:29:01+5:302018-02-17T00:29:13+5:30
निवडणुका लढविणा-या उमेदवाराने स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नाचे स्रोत व मालमत्ता जाहीर करावी. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शी होण्यास मदत होईल, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे विविध राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे.

उमेदवारांना जाहीर करावे लागणार कुटुंबीयांच्याही उत्पन्नाचे स्रोत
नवी दिल्ली : निवडणुका लढविणा-या उमेदवाराने स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नाचे स्रोत व मालमत्ता जाहीर करावी. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शी होण्यास मदत होईल, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे विविध राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे.
लखनौमधील लोकप्रहरी या संस्थेच्या जनहित याचिकेवर न्या. जे चेलामेश्वर व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. उमेदवारांनी त्यांची केवळ मालमत्ता जाहीर करु नये, तर उत्पन्नाचे स्रोतही जाहीर करणे बंधनकारक करावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. या निकालाचे काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप यांनी स्वागत केले आहे. विद्यमान कायद्यानुसार उमेदवाराने आपली स्वत:ची मालमत्ता व दायित्व तसेच पत्नी व त्याच्यावर अवलंबून असलेल्या तीन व्यक्तींच्या नावावर असलेल्या गोष्टी यांची माहिती उमेदवारी अर्ज दाखल करताना फॉर्म २६मध्ये भरणे आवश्यक आहे. मात्र या उत्पन्नाचा स्रोत सांगण्याचे बंधन मात्र नाही. माकपचे नेते मोहम्मद सलीम म्हणाले की,
या निकालाला आमचा पाठिंबा
आहे. आयोगाने आजवर पैशाचा स्रोताकडे मात्र दुर्लक्ष झाले होते.
आता तसा कायदा करणे आवश्यक
काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, न्यायालयाने चांगल्या हेतूनेच निकाल दिला असेल. पण उत्पन्नाचे स्रोत ही संकल्पना अजून पुरेशी स्पष्ट होण्याची गरज आहे. या स्रोतांचा शोध घेणे, हे त्याहून कठीण काम आहे. न्यायालयाच्या निकालानुसार कायदेमंडळाने हालचाल करायला हवी.