शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कॅनाडाचं अत्यंत हीन कृत्य, चीन-पाकिस्तानंही कधी असं केलं नाही! भारतानंही दिलं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 20:02 IST

....आता आणखी एक पाऊल पुढे टाकत कॅनाडाने असे कृत्य केले आहे, जसे कधी पाकिस्‍तान आणि चीनसारख्या विरोधी देशांनीही केले नाही.

खालिस्‍तान समर्थक कॅनाडासोबतचे भारताचे संबंध अत्यंत बिघडले आहेत. एक दिवस आधीच पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी, कॅनाडाच्या भूमीवर खालिस्‍तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्‍जरच्या हत्तेचा आरोप भारतीय संरक्षण संस्थेवर केला होता. एवढेच नाही, तर आता आणखी एक पाऊल पुढे टाकत कॅनाडाने असे कृत्य केले आहे, जसे कधी पाकिस्‍तान आणि चीनसारख्या विरोधी देशांनीही केले नाही. कॅनाडाने भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी पवन कुमार राय यांचे नाव जाणूनबुजून उघड कले आहे.

यापूर्वी भारताने चीन आणि पाकिस्‍तानच्या राजदुतांवर कारवाई केली. मात्र, कधीही गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्याचे नाव उघड केले नाही. एवढेच नाही, तर भारताचे कट्टर विरोधी देश असलेल्या चीन आणि पाकिस्‍ताननेही असे केले नाही. कॅनडाच्या या अत्यंत खालच्या दर्जाच्या कृत्यावर सर्वच स्थरांतून टीका होत आहे.

गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्यासंदर्भात अशी आहे परंपरा - गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्यासंदर्भात एक जुनीच परंपरा आहे.  दुसऱ्या देशांतील दूतावासात गुप्तचर संस्थेचा एक अधिकारीही तैनात असतो. यासंदर्भात केवळ संबंधित देशातील सरकारलाच माहिती दिली जाते. मात्र, संबंधित देश या अधिकाऱ्याचे नाव कधीही उघड करत नाही, अशी परंपरा आहे. मात्र, कॅनडाने भारतीय संस्थेचे अधिकारी पवन कुमार राय यांचे उघड करून अत्यंत हीन दर्जाचे कृत्य तेले आहे. कॅनडाने पवन कुमार राय यांना भारत परतण्याचे फरमान सोडले आहे.

भारताचंही चौख प्रत्युत्तर - कॅनाडाच्या या कृत्याचे भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. भारतानेही कारवाई करत कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी ऑलिव्हियर सिल्वेस्टर यांना निष्कासित केले आहे. त्यांना पुढील पाच दिवसांच्या आत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच, भारत सरकारने कॅनाडाचे सर्वच आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचे म्हटले असून त्यांना भारता विरोधी काम करत असलेल्या खालिस्‍तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतGovernmentसरकारchinaचीनPakistanपाकिस्तान