शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत चलनी नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का? जाणून घ्या काय आहेत नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:04 IST

राज्यसभेत चलनी नोटा सापडल्यामुळे मोठा गदारोळ सरू आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

राज्यसभेत नोटांचे बंडल सापडल्याने गदारोळ झाला. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी नोटा सापडल्याची माहिती दिली. हे नोटांचे बंडल सीट क्रमांक २२२ वर सापडले असल्याचे त्यांनी सांगितले. ही जागा काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. यावरुन आता गदारोळ सुरू आहे. 

अध्यक्ष धनखड म्हणाले की, गुरुवारी सुरक्षा अधिकाऱ्यांनी माहिती दिली की सीट क्रमांक २२२ जवळ रोख रक्कम सापडली आहे. या प्रकरणाचा तपास नियमानुसार सुरू आहे. 

नोटांचे बंडल सापडल्याची माहिती समोर येताच राज्यसभेत गदारोळ सुरू झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सिंघवी यांचे नाव घेतल्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सर्वकाही स्पष्ट होत नाही तोपर्यंत अध्यक्षांनी सिंघवी यांचे नाव घ्यायला नको होते. खरगे यांच्या आरोपांवर सभापती धनखड म्हणाले की, कोणत्या जागेवर रोख रक्कम सापडली आणि ती सीट कोणाची आहे हे सांगितले आहे.

सिंघवींनी दिले स्पष्टीकरण खासदार सिंघवी म्हणाले, , 'हे मी पहिल्यांदाच ऐकले आहे, मी जेव्हाही राज्यसभेत जातो तेव्हा ५०० रुपयांची नोट सोबत घेतो. काल दुपारी १२.५७ वाजता मी  सदनमध्ये पोहोचलो आणि १ वाजता सदन सुरू झाले. त्यानंतर मी खासदार अयोध्या रामी रेड्डी यांच्यासोबत दुपारी दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो आणि मग संसदेतून बाहेर पडलो, असं स्पष्टीकरण मनू सिंघवी यांनी दिले.

संसदेत चलनी नोटा घेऊन जाऊ शकतो का?

संसदेत नोटा आणाव्यात की आणू नये असा काही नियम नाही. कोणताही खासदार किती चलन आत घेऊन जाऊ शकतो यावर मर्यादा नाही. असे अनेक खासदार आहेत जे डिजिटल पेमेंटचा वापर करत नाहीत, ते संसदेच्या आतील बँकेच्या शाखेतून पैसे काढतात आणि चेंबरमध्ये घेऊन जातात.

सीटजवळील नोटांचे हे बंडल कुठून आले याची चौकशी केली जाईल. अभिषेक मनू सिंघवी यांनी फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन सभागृहात जात असल्याचा दावा केला आहे.  या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता हे सर्व राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर अवलंबून आहे की ते दिल्ली पोलिसांकडे तपास सोपवतात की अन्य एजन्सीकडे देतात.

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस