शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: लग्न मंडपाकडे नाचत निघाली वधू; वऱ्हाडाला वाहनाची धडक; नातेवाईक हवेत उडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 08:56 IST

भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद; दुर्घटनेत एकाचा मृत्यू, १२ जण जखमी

मुझफ्फरनगर: लग्न मंडपाकडे निघालेल्या वऱ्हाडी मंडळीच्या वाहनाला भरधाव वेगानं आलेल्या वाहनानं धडक दिल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये घडली. मंगळवारी रात्री हा भीषण अपघात घडला. त्यामुळे आनंदात असलेल्या कुटुंब आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या ३० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये वधू अतिशय आनंदात दिसत आहे. ती एका पांढऱ्या रंगाच्या कारच्या सनरुफमधून बाहेर आली आहे. आसपास असलेले नातेवाईक गाण्यांवर नाचत असल्यानं वधूनंदेखील ठेका धरला आहे. तिनं काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. व्हिडीओमध्ये गाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. वऱ्हाडी मंडळी आनंदात विवाह स्थळाकडे जाताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटच्या काही सेकंदात वधूच्या डाव्या बाजूला मोठा आवाज ऐकू येतो. एक वाहन अतिशय वेगात तिच्या शेजारी असलेल्या व्यक्तीला धडक देतं. वाहनाचा वेग अतिशय जास्त असल्यानं ते वाहन नेमकं कोणतं होतं, तेदेखील व्हिडीओतून समजत नाही. पण त्या वाहनानं दिलेल्या जोरदार धडकेनं वधू शेजारील काही व्यक्ती अक्षरश: हवेत उडालेल्या दिसतात. सुदैवानं भरधाव वाहनानं कारला धडक दिली नाही. त्यामुळे वधूला कोणतीही इजा झाली नाही.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात