शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

CoronaVirus: आजारी मुलाच्या दुधासाठी आईचं थेट मोदींना ट्विट अन् थेट राजस्थानमधून २० लिटर दूध मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 12:40 IST

coronavirus सांडणीच्या दुधासाठी मालगाडीला विशेष थांबा; महिलेच्या ट्विटची पंतप्रधानांकडून दखल

मुंबई: माझा मुलगा ऑटिजमनं ग्रस्त असून त्याला सांडणीच्या दुधाची आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे माझ्याकडे सांडणीचं दूध उपलब्ध नाही. कृपया मदत करा, असं ट्विट मुंबईतल्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या महिलेनं केलं. या ट्विटमध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं होतं. यानंतर वेगानं चक्र फिरली आणि थेट राजस्थानहून मुंबईत २० लिटर सांडणीचं दूध पोहोचवण्यात आलं. मुंबईतल्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या नेहा सिन्हा यांनी पंतप्रधान टॅग करून एक ट्विट केलं होतं. 'सर, माझा साडे तीन वर्षांचा ऑटिजमनं (स्वमग्नता) ग्रस्त असून त्याला खाद्य पदार्थांची गंभीर स्वरुपाची एलर्जी आहे. तो केवळ सांडणीचं दूध पितो आणि अतिशय मर्यादित प्रमाणात डाळी खातो. लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा माझ्याकडे सांडणीचं दूध पुरेशा प्रमाणात नव्हतं. राजस्थानच्या सादरीहून सांडणीचं दूध किंवा त्या दुधाची पावडर आणण्यासाठी मदत करा,' असं साकडं महिलेनं घातलं होतं.या ट्विटनंतर प्रशासकीय पातळीवर वेगानं चक्र फिरली. ओदिशा केडरचे आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांच्यापासून राजस्थानपर्यंतचे अधिकारी तातडीनं कामाला लागले.  सिन्हा यांचं ट्विट पाहिल्यानंतर बोथरा यांनी वायव्य रेल्वेचे मुख्य प्रवासी परिवहन व्यवस्थापक तरुण जैन यांच्याशी संपर्क साधला. जैन यांनी वरिष्ठ व्यवस्थापक महेश चंद जेवालिया यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लुधियानाहून वांद्रे टर्मिनसला येणाऱ्या मालगाडीला अजमेरच्या फालना स्थानकात थांबण्याची सूचना देण्यात आली. विशेष म्हणजे फालना स्थानकातला हा थांबा पूर्वनियोजित नव्हता. सांडणीचं दूध पुरवणाऱ्या व्यक्तीसाठी फालना स्थानक जवळ असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. सांडणीच्या दुधाचं पार्सल घेण्यासाठी रेल्वे स्थानकातलं बुकिंग काऊंटर सुरू करण्यात आलं. ही मालगाडी रात्री वांद्रे टर्मिनसला पोहोचली. त्यानंतर साडे आठ वाजता महिलेच्या घरी २० लिटर सांडणीचं दूध (फ्रोजन) आणि २० किलो दूध पावडर पोहोचवण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी