शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह अडचणीत; निवडणूक आयोगाची राष्ट्रपतींकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 11:35 IST

राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह आपल्या एका विधानामुळे अडचणीत सापडले आहेत.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यातच कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडून भाषणादरम्यान आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग नजर ठेवून आहे.

राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह आपल्या एका विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाने कल्याण सिंह यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. सोमवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत कल्याण सिंह यांनी केलेल्या विधानावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी केलेले विधान म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्र पाठवून तक्रार करण्यात आली आहे. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात अलीगडमध्ये कल्याण सिंह म्हणाले होते की, 'आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहेत. भाजपाचा विजय व्हावा, असे आम्हाला वाटले. देशासाठी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत.' दरम्यान, या  विधानांवरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. या पदावर विराजमान व्यक्तीने कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणे योग्य नाही. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1999मध्ये त्यांनी भाजपा सोडून जनक्रांती पक्षाची स्थापना केली. मात्र, कालांतरानं त्यांनी जनक्रांती पक्ष भाजपामध्ये विलीन केला. 2014मध्ये केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर कल्याण सिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदRajasthanराजस्थान