वासराचा चेहरा माणसासारखा

By Admin | Updated: June 5, 2017 04:22 IST2017-06-05T04:22:44+5:302017-06-05T04:22:44+5:30

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये सध्या या घटनेची जोरात चर्चा सुरू आहे.

The calf face is like a man | वासराचा चेहरा माणसासारखा

वासराचा चेहरा माणसासारखा


मुजफ्फरनगर : हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये सध्या या घटनेची जोरात चर्चा सुरू आहे. येथील एका गायीने विचित्र वासराला जन्म दिला आहे. या वासराचा चेहरा माणसासारखा आहे. जन्मानंतर एका तासातच या वासराचा मृत्यू झाला. ही बातमी सर्वत्र पसरली आणि पाहता पाहता या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली. या मृत वासराला सध्या एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे. लोक त्याची पूजा करत आहेत. स्थानिक लोक याला दैवी अवतार मानत आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी अजय देशमुख यांनी सांगितले की, यात कोणताही चमत्कार नाही. या वासराच्या शरीराची वाढ न झाल्याने ते अशा स्वरूपात जन्माला आले आहे.

Web Title: The calf face is like a man